उद्धव ठाकरे म्हणाले, मलाही पाचवा भाऊ करून घ्या!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जुलै 2018

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत किशोर दराडे यांनी एकतर्फी विजय संपादन केल्यानंतर आज शनिवारी सर्वच प्रमुख पदाधिकाऱयांसह दराडे यांनी मातोश्रीवर जाऊन ठाकरे यांची भेट घेतली.यावेळी दराडे यांच्या नियोजनबद्ध निवडणूक लढविण्याच्या पद्धतीला ठाकरे यांनी दाद देत मनभरून कौतुक केले.

येवला : नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा जिंकल्यानंतर शिवसेनेने राज्यातील सर्वच ठिकाणी विजय मिळवला आहे. विजयाचा हा सिलसीला यापुढेही कायम ठेवा, संघटन वाढवा व येत्या निवडणुकीत विधानसभेवर भगवा फडकवण्यासाठी एकदिलाने काम करा अशा सूचना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिल्या.

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत किशोर दराडे यांनी एकतर्फी विजय संपादन केल्यानंतर आज शनिवारी सर्वच प्रमुख पदाधिकाऱयांसह दराडे यांनी मातोश्रीवर जाऊन ठाकरे यांची भेट घेतली.यावेळी दराडे यांच्या नियोजनबद्ध निवडणूक लढविण्याच्या पद्धतीला ठाकरे यांनी दाद देत मनभरून कौतुक केले.

यावेळी श्री. ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी किशोर दराडे यांचे औक्षण करून मातोश्रीवर फक्त मंत्र्यांचेच औक्षण केले आहे तुम्ही पहिले आमदार असल्याचेही यावेळी रश्मी ठाकरे म्हणाल्या.पक्षाचे उत्तमपणे काम करून संघटन वाढवा असे आशीर्वादही त्यांनी दिले.

या वेळी उद्धव ठाकरे यांनी किशोर दराडेंना पेढा भरवत भगवी शाल देऊन सत्कार केला. यावेळी निवडणुकीच्या गप्पा मारतांना ठाकरे यांनी किशोर दराडेंना आपण किती भाऊ आहेत हा प्रश्न केला.यावर दराडे यांनी चार भाऊ असल्याचे सांगताच ठाकरे यांनी मला ही पाचवा भाऊ करून घ्या म्हणजे सेनेला चांगले दिवस येतील असे म्हणत विनोद केला. श्री ठाकरे यांनी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांची मनमोकळेपणाने गप्पा मारत एकत्रित बसून फोटोसेशन देखील केले.यावेळी ठाकरे यांनी दराडेंसह राज्यमंत्री दादा भुसे व टीडीएफचे नेते संभाजी पाटील यांचाही सत्कार केला.

या प्रसंगी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ चौधरी,राज्यमंत्री दादा भुसे, आमदार नरेंद्र दराडे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर,भाऊलाल तांबडे, दत्ता गायकवाड, विनायक पांडे, सुधाकर बडगुजर,संभाजीराजे पवार, महेश बडवे,
शहरप्रमुख राजेंद्र लोणारी,शिक्षक सेनेचे नेते संजय चव्हाण,शेटय़े,वाघ आदी उपस्थित होते.

Web Title: Uddhav Thackeray meet Kishor Darade