शाहूनगरातील अनधिकृत बांधकाम काढले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

जळगाव - अनधिकृत बांधकाम केलेले अतिक्रमण काढण्याची कारवाई महापालिका प्रशासनाकडून सुरू असून, गटारांवर झालेल्या बांधकामामुळे रस्त्यावर साचणारे सांडपाणी आणि यातून निर्माण होणारा आरोग्याचा प्रश्‍न याबाबत आलेल्या तक्रारीवरून शाहूनगर भागातील तपस्वी हनुमान मंदिर ते पिंप्राळा रोड भागात गटारांवरील अतिक्रमण काढण्याची कारवाई आज करण्यात आली.

शहरातील पिंप्राळा रस्त्यावरील तपस्वी हनुमान मंदिर ते पिंप्राळा रेल्वेगेट या शाहूनगर परिसरातील गटारावर झालेल्या अतिक्रमणाबाबत महापौर व आरोग्य विभागाकडे तक्रार आली होती. याची दखल घेऊन अतिक्रमण विभागाकडून आज (ता.७) तपस्वी हनुमान मंदिरापासून ते जळकी मिलपर्यंत असलेल्या गटारांवर रहिवाशांनी शौचालय, बाथरूम, स्लॅब, जिने अशा प्रकारे केलेले बांधकाम काढण्याची कारवाई केली. अतिक्रमणामुळे येथील गटारांमधील घाण काढण्यास अडचणी निर्माण होत असे. गटारांमध्ये घाण साचल्याने गटारीतील सांडपाणी रस्त्यांवर येत असल्याने यातून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला होता. याबाबत काही रहिवाशांनी महापौर नितीन लढ्ढा यांच्यासह मनपाच्या आरोग्य विभागाकडे तक्रारी दिल्या होत्या. त्यानुसार आज सकाळी साडेदहापासून अतिक्रमण काढण्यास सुरवात करण्यात आली.

गटारांवरील अनधिकृत बांधकाम पाडले
शाहूनगरातील तपस्वी हनुमान मंदिर ते जळकी मिलपर्यंतच्या गटारांवर रहिवाशांनी शौचालय, बाथरूम, स्लॅब, जिने असे बांधकाम करून रोडवर १५ फुटांपर्यंत अतिक्रमण केले होते. अतिक्रमण विभागाच्या पथकाकडून रस्त्याच्या डाव्या बाजूच्या गटारांवरील अतिक्रमित बांधकाम पाडण्यात आले. सायंकाळपर्यंत २० बांधकामे पाडण्यात आली असून, उद्या (ता.८) देखील या भागातील उजव्या बाजूकडील अनधिकृत बांधकाम पाडण्यात येणार असल्याची माहिती अधीक्षक एच. एम. खान यांनी दिली. 

Web Title: unauthorized construction out in shahunagar