अनाधिकृत विहीर बुजणे आले अंगलट 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 डिसेंबर 2018

पारोळा - इंधवे (ता. पारोळा) येथे अनधिकृतपणे विहीर खोदून ती बुजणे उपसरपंच जितेंद्र पाटील याच्या अंगलट आले आहे. याप्रकरणी जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाचे अभियंता एस. बी. गायकवाड यांनी येथील पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने जितेंद्र पाटलावर काल गुन्हा दाखल झाला आहे. 

पारोळा - इंधवे (ता. पारोळा) येथे अनधिकृतपणे विहीर खोदून ती बुजणे उपसरपंच जितेंद्र पाटील याच्या अंगलट आले आहे. याप्रकरणी जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाचे अभियंता एस. बी. गायकवाड यांनी येथील पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने जितेंद्र पाटलावर काल गुन्हा दाखल झाला आहे. 

इंधवे येथील ज्येष्ठ नागरिक माधवराव गणपत पाटील यांनी अनधिकृत विहीरीबाबत जि. प. लघुसिंचन विभागाकडे 2012 ला तक्रार केली होती. याप्रकरणी अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, कार्यकारी अभियंता आर. के. नाईक यांच्यासह दहा अधिकाऱ्यांच्या पथकाने प्रत्यक्ष धरणाची पाहणी करून स्थळाचा पंचनामा केला होता. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिस अधीक्षक दत्ता शिंदे यांनी तत्काळ दखल घेण्याचे आदेश 15 दिवसांपूर्वीच दिले होते. मात्र, संबंधितांनी ती अनधिकृत विहीर गुन्हा दाखल करण्या अगोदरच बुजवून टाकली. त्यानंतर पुन्हा पेच निर्माण झाल्याने लघुसिंचन विभागाने शिवाजी दिवेकर यांचा अभिप्राय मागविला. त्यांच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला. 

सत्य परेशान...पराजित  नही : माधवराव पाटील 
गेल्या सहा वर्षांपासून विविध कामांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आपली लढाई सुरू आहे. त्यातीलच एक अनधिकृत विहिरीची एक तक्रार आपण केली होती. विहीर बुजण्याची मागणी होती. मात्र, यावर्षी दुष्काळामुळे पाणीटंचाई असल्याने अधिकाऱ्यांनी सिंचन विभागाला विहीर ताब्यात घ्यावी, ग्रामस्थांना पाणी द्यावे. पाणीचोरावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती. मात्र, तरीही संबंधिताने ती विहीर बुजवून पुरावा नष्ट केला. मात्र, आपल्या पाठपुराव्याने सर्व बाबी उघड झाल्या आहेत. "सत्य परेशान होता है लेकिन पराजित नही', अशी प्रतिक्रिया तक्रारदार माधवराव पाटील यांनी दिली. 

Web Title: unauthorized digging a well