भाचीने मित्राचे नाव मेहंदीने हातावर कोरले..अन् मामाने मात्र..  

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

नाजिया पुण्यात आई-वडिलांबरोबर राहाते. आईबरोबर ती कामाला जाते. तेथे तिने डाव्या हातावर मेंदीने तिचे व मित्राचे नाव लिहिले. हा प्रकार घरातील लोकांना आवडला नाही. त्यांनी तिला तत्काळ मालेगाव येथे रमजानपुरात राहणाऱ्या रहेमान शेख उस्मान शेख (रा. कुरैशा मशिदीजवळ) मामाकडे आणून सोडले. मामालाही हा प्रकार आवडला नाही. त्याने नाजियाचे हात-पाय दोरीने बांधून तिचे केस कापले. घरातील सुरी चुलीवर गरम करून मेंदी काढलेल्या ठिकाणी चटके दिले.

नाशिक : मालेगाव येथील रमजानपुरा भागातील १६ वर्षीय तरुणीने डाव्या हातावर तिचे व तिचा मित्र विकी याचे नाव मेंदीने लिहिल्याचा राग आल्याने तिच्या मामाने तापलेल्या सुरीने मेंदी काढलेल्या ठिकाणी चटके दिले. हात-पाय बांधून डोक्‍याचे केस कापले. शनिवारी (ता. १६) सकाळी आठच्या सुमारास हा प्रकार घडला. पीडित तरुणी नाजिया फिरोज शेख (रा. कुरैशा मशिदीजवळ, रमजानपुरा) हिने सोमवारी (ता. १८) सायंकाळी पोलिसांत तक्रार दिली. 

नाजियाचे हात-पाय दोरीने बांधून तिचे केस कापले
नाजिया पुण्यात आई-वडिलांबरोबर राहाते. आईबरोबर ती कामाला जाते. तेथे तिने डाव्या हातावर मेंदीने तिचे व मित्राचे नाव लिहिले. हा प्रकार घरातील लोकांना आवडला नाही. त्यांनी तिला तत्काळ मालेगाव येथे रमजानपुरात राहणाऱ्या रहेमान शेख उस्मान शेख (रा. कुरैशा मशिदीजवळ) मामाकडे आणून सोडले. मामालाही हा प्रकार आवडला नाही. त्याने नाजियाचे हात-पाय दोरीने बांधून तिचे केस कापले. घरातील सुरी चुलीवर गरम करून मेंदी काढलेल्या ठिकाणी चटके दिले. या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितले, तर तुला अजून त्रास देऊ, असा दम दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. जखमी नाजिया सामान्य रुग्णालयात दाखल झाली. उपचारानंतर ती थेट पोलिस ठाण्यात गेली. याप्रकरणी तिचा मामा रहेमान शेखविरुद्ध रमजानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नाजियाला तिच्या येथे राहणाऱ्या सावत्र आईकडे सुपूर्द केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uncle Hit her Niece Crime News Nashik Marathi News

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: