Municipal Corporation News : धुळ्यासाठी 894 कोटींचा निधी मंजूर

Dhule Municipal Corporation
Dhule Municipal Corporationesakal

Dhule News : केंद्रीय अमृत योजना-२ अंतर्गत महापालिका क्षेत्रात नवीन पाणीपुरवठा योजना, तसेच देवपूर वगळता उर्वरित शहरातील भूमिगत गटार योजनेसाठी तब्बल ८९४ कोटींचा निधी मंजूर झाल्याची खूशखबर खासदार डॉ. सुभाष भामरे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी गुरुवारी (ता. १८) दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार डॉ. भामरे यांच्या पाठपुराव्याने हा प्रश्‍न मार्गी लागल्याचे महापौर प्रतिभा चौधरी आणि श्री. अग्रवाल यांनी सांगितले. (Under Amrut Yojana solved city water supply underground sewerage issues 894 crore fund approved for Dhule Dhule News)

Dhule Municipal Corporation
Jalgaon News : मुख्य रस्त्यावर वाढतेय अतिक्रमण; कर्मचारी वाढवूनही ‘जैसे थे’

मंजूर निधीमुळे महापालिकेच्या हद्दवाढ क्षेत्रातील गावे, शहरातील उर्वरित भागाच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्‍न, तसेच देवपूर वगळता शहरातील उर्वरित भागातील भूमिगत गटारीचा प्रश्‍न निकाली निघाला आहे.

यात नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत १७७ कोटी, तसेच भूमिगत गटार योजनेसाठी (ड्रेनेज लाइन) नव्याने ७१७ कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. याकामी खासदार डॉ. भामरे, जिल्हाध्यक्ष अग्रवाल आणि महापौर चौधरी यांच्या सततच्या पाठपुराव्यास यश लाभू शकले.

Dhule Municipal Corporation
Dhule Crime : लळिंगला हाणामारी; 8 जणांवर गुन्हा

दहा दिवसांत निविदा

मंत्रालयात एसएलटीची बैठक झाली. तीत दोन्ही योजनांना मंजुरी देण्यात आली. येत्या दहा दिवसांत निविदा प्रक्रिया होणार असल्याची माहिती श्री. अग्रवाल यांनी दिली.

केंद्रीय अमृत योजना-२ मध्ये धुळे शहराचा समावेश करणे, याद्वारे शहरातील पाणीपुरवठा आणि मलनिस्सारणासंबंधी समस्यांचे कायमस्वरूपी निराकरण करणे यासाठी खासदार डॉ. भामरे यांचा पाठपुरावा सुरू होता.

तसेच हे प्रश्‍न मार्गी लागण्यासाठी श्री. अग्रवाल प्रयत्नशील होते. त्यांच्या पाठपुराव्याअंती मंत्रालयात एसएलटीची गुरुवारी बैठक झाली. तिची फलनिष्पत्ती ८९४ कोटींचा निधी धुळ्याच्या पदरात पडला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dhule Municipal Corporation
Dhule Crime : अत्याचारातून अल्पवयीन मुलीची प्रसूती, चिंग्या नामक तरुणावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

शहरात ड्रेनेज लाइन

शहरातील भूमिगत गटार योजनेसाठी खासदार डॉ. भामरे यांनी अमृत योजनेंतर्गत पूर्वी सुमारे १५० कोटींचा निधी मंजूर करून आणला होता. त्यातून देवपूर भागात या योजनेची अंमलबजावणी होऊन भविष्यातील सरासरी वीस ते पंचवीस वर्षांचा आरोग्याचा प्रश्न निकाली काढला आहे.

या योजनेची अंमलबजावणी पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. यानंतर देवपूर वगळता उर्वरित शहरासाठी भूमिगत गटार योजनेंतर्गत ७१७ कोटींचा निधी त्यांनी मंजूर करून घेतला आहे. शहरात सर्वच भागात ही योजना झाल्यावर उघड्यावरील गटारी बंद होतील. अस्वच्छतेचा प्रश्‍न संपू शकेल.

Dhule Municipal Corporation
Jalgaon Crime News : जळगाव शहराची ‘क्राइम कॅपिटल’कडे वाटचाल? किरकोळ वादातून वातावरण तापतेय

स्मार्टसिटीचे व्हिजन

भाजपने सांगितले, की खासदार डॉ. भामरे, जिल्हाध्यक्ष अग्रवाल यांचे स्मार्ट धुळे सिटी साकारण्याचे व्हिजन आहे. पक्षाच्या माध्यमातून शहर विकासाची निरनिराळी कामे सुरू आहेत. पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणावर भर दिला जात आहे.

त्यासाठी नगरोत्थान योजनेतून शहरातील रस्त्यांसाठी ६० कोटींचा निधी मंजूर करून घेतला. यापाठोपाठ ८९४ कोटींच्या निधीमुळे विकासाचा मोठा टप्पा गाठला गेल्याने भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी खासदार डॉ. भामरे, जिल्हाध्यक्ष अग्रवाल यांच्या कार्याची प्रशंसा केली आहे.

Dhule Municipal Corporation
Dhule Crime : लळिंगला हाणामारी; 8 जणांवर गुन्हा

धुळ्याच्या समृद्धतेसाठी वेळोवेळी भरीव विकास निधीची उपलब्धी आणि आता ८९४ कोटींचा निधी मिळाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार डॉ. सुभाष भामरे यांचे महापौर प्रतिभा चौधरी यांच्यासह मी आभार मानतो.

भारतीय जनता पक्ष धुळे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जोरकसपणे कार्यशील आहे. विकासाचे व्हिजन समोर ठेवत शहराला स्मार्टसिटीकडे नेले जात आहे. रस्ते, पाणी, आरोग्य, सुशोभीकरण आदी सर्व विषयांना प्राधान्य दिले जात आहे. विकासासाठी निधी खेचून आणला जात आहे.

-अनुप अग्रवाल, शहर-जिल्हाध्यक्ष, भाजप

Dhule Municipal Corporation
Dhule Water Cut : तापी योजनेवरून शनिवारी पाणीपुरवठा बंद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com