येवल्यातील रखडलेली भुयारी गटार योजना मार्गी लावणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जुलै 2018

येवला : शहरात राबवली जाणारी भुयारी गटार योजना निधीअभावी अपूर्ण अवस्थेत असून या कामाला चालना द्यावी अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.यावेळी काम मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी भुजबळांना दिले.

येवला : शहरात राबवली जाणारी भुयारी गटार योजना निधीअभावी अपूर्ण अवस्थेत असून या कामाला चालना द्यावी अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.यावेळी काम मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी भुजबळांना दिले.

शहराच्या भुयारी गटार योजनेस युआडी-एसएसएमटी कार्यक्रमांतर्गत ४७.३० कोटीस मंजुरी मिळालेली होती.योजनेस केंद्र शासनाचे ८० व राज्य शासनाचे १० टक्के तर नगरपालिकेचा १० टक्के स्वहिस्सा प्रमाणे अनुदान होते. योजनेस या योजनेच्या अंमलबजावणीमुळे एक महत्वाचे मूलभूत सुविधेचे विकास काम पूर्ण होवून शहरातील अस्वच्छतेचा प्रश्न सुटून साथीच्या रोगांचा प्रसार व फैलाव होण्याचा धोका टळणार होता.केंद्र शासनाने अचानक कार्यक्रम रद्द करून पूर्वीचा निधी वितरीत न झालेल्या योजना रद्द केल्या.यातील काही योजना अमृत अभियानात समाविष्ट केल्या गेल्या.परंतु भुयारी गटार योजना अमृत योजनेत सुद्धा समाविष्ट करण्यात आली नाही. त्यामुळे शासकीय अनुदान मिळण्याची शक्यता धूसर झाली. निधी उपलब्ध न झाल्याने योजनेचे काम अर्धवट स्थितीत बंद पडले. झालेले काम वापरात येवू शकत नाही. यामुळे शहरात स्वच्छतेचे अनेक प्रश्न निर्माण झाले असल्याचे भुजबळांनी म्हटले आहे.

सदर काम अर्धवट झाल्यामुळे वापरात येत नसून काही लोक घरचे घाण पाणी जोडत आहे.परिणामी पाईपलाईन चोकअप होवून पुढे घाणपाणी चेंबर्समधून बाहेर रस्त्यावर येवून अनारोग्य व साथीचे रोग फैलावत आहे.भुयारी गटार योजना पूर्ण झाल्यास नागरिकांच्या मालमत्तेची किंमत आपोआपच वाढणार असून नागरिकांचा प्रशासन व शासनावरील विश्वास दृढ होणार आहे.योजना पूर्ण करणेच्या दृष्टीने योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी भुजबळ यांनी फडणवीस यांच्याकडे केली आहे.यावेळी भुजबळ यांनी शहरातील अस्वछता व अनारोग्याबाबत मुख्यमंत्र्यांना छायाचित्रे दाखवून शहरातील अस्वचतेची जाणीव करून दिली.

Web Title: underground gutter scheme try to complete in yeola