Dhule News : लग्नाच्या तीन दिवस आधीच आधीच नियतीने हिरावले | unfortunate death of young man from Board three days before his wedding Dhule News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Death News

Dhule News : लग्नाच्या तीन दिवस आधीच आधीच नियतीने हिरावले

Dhule News : बोरद (ता. तळोदा) येथील एका तरुणाचा लग्नाच्या तीन दिवस आधीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. २५) दुपारी तीनला घडली आहे.

२२ वर्षीय तरुण घरातील बाथरूममध्ये काम करीत असताना अचानक खाली कोसळला. (unfortunate death of young man from Board three days before his wedding Dhule News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नातेवाईक त्याला शहादा येथील उपचारासाठी नेत असताना त्याचा मृत्यू झाला. चेतन राजाराम कोळी (वय २२) असे तरुणाचे नाव आहे.

त्याचा येत्या २९ मेस शिंदखेडा येथील मुलीशी विवाह होणार होता. चेतन अहमदाबाद (गुजरात) याठिकाणी नोकरीला होता. लग्नानिमित्त काही दिवसांच्या रजेवर तो घरी आपल्या बोरद या गावी परतला आला होता.

तो लग्नाच्या तयारीत व्यस्त होता. बोरद येथील देवीदास शिरसाठ यांचा पुतण्या, (कै.) राजाराम शिरसाठ यांचा तो पुत्र होत.