राज्यपालांच्या उपस्थितीत उद्या आरोग्य विद्यापीठाचा दीक्षान्त सोहळा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 डिसेंबर 2016

नाशिक - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा सोळावा दीक्षान्त समारंभ मंगळवारी (ता. 20) सकाळी अकराला विद्यापीठाच्या प्रांगणातील शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनीत होणार आहे. समारंभास विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहतील. समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना डी.लिटने सन्मानित केले जाणार आहे. विविध विद्याशाखांतील आठ हजार 887 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार आहे.

सोहळ्यास प्रति-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या सचिव मेधा गाडगीळ, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे, कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, प्रति-कुलगुरू डॉ. मोहन खामगावकर आदी उपस्थित राहतील.

Web Title: University Convocation ceremony on Thursday in the presence of the governor's