Unseasonal Rain : अवकाळी पावसाने बंधाऱ्यांमध्येही संचय; पिकांचे मोठे नुकसान | Unseasonal rains have created satisfactory storage in 2 dams in Nagaon area dhule news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

The embankment in Shivara is filled with unseasonal rains and the water accumulated in the dam near Nagaon due to the tapi water channel leakage.

Unseasonal Rain : अवकाळी पावसाने बंधाऱ्यांमध्येही संचय; पिकांचे मोठे नुकसान

Dhule News : धुळे जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. रब्बीसह उन्हाळी पिके, भाजीपाला, फळ बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. अद्यापही पावसाचे वातावरण काही दिवस आहे. (Unseasonal rains have created satisfactory storage in 2 dams in Nagaon area dhule news)

आतापर्यंतच्या नुकसानीचे अद्याप पंचनामे झालेले नाहीत. त्यामुळे नुकसानभरपाई मिळण्याच्या आशा धूसरच आहेत. अवकाळी पावसाने आणि तापी जलवाहिनीच्या गळतीने नगाव परिसरातील दोन बंधाऱ्यांमध्ये समाधानकारक साठा झाला आहे. गेल्या रविवारी नगाव परिसरात मुसळधार पावसासह गारपीट झाली होती.

अवकाळीने पिकांना अवकळा

गेल्या ४ एप्रिलपासून धुळे जिल्ह्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. गेल्या वर्षी खरिपाच्या उत्तरार्धात अधिकचा पाऊस झाला. नदी-नाले खळखळून वाहिले. धरण, प्रकल्प व बंधारे तुडुंब झाले.

विहिरी व कूपनलिकांची पातळी अद्यापही बऱ्यापैकी टिकून आहे. रब्बीसह उन्हाळी बागायती वाढली आहे. अवकाळीच्या सातत्यपूर्ण पावसाने बागायतीचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळीने पिकांना अवकळा आली आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

पंचनामे केव्हा?

अवकाळी पाऊस आणि गारपिटीने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तीस दिवसांत तब्बल आठ वेळा अवकाळी बरसला आहे. पिकांचे नुकसान झाले आहे. तरीही महसूल आणि कृषी विभागाचे कर्मचारी शेती शिवारात फिरकलेले नाहीत.

नुकसानीचे पंचनामे नाहीत. आम्हाला पंचनाम्याचे आदेश नाहीत, असे म्हणत शेतकऱ्यांची मागणी धुडकावून लावत आहेत. पावसाळा अवघा महिन्यावर आला आहे. शेतकऱ्यांनी नुकसानग्रस्त पिके आवरायची आहेत. खरिपासाठी शेती तयार करायची आहे. अशा स्थितीत पंचनामे तत्काळ करण्याची अपेक्षावजा मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

एक तुडुंब, दुसऱ्या‍यात डबके

नगाव (ता. धुळे) शिवारात दोन बंधाऱ्यांत समाधानकारक साठा झाला आहे. अवकाळी पावसाने बंधारे भरले आहेत. या बंधाऱ्यांमध्ये तापी जलवाहिनीच्या गळतीचा फायदा झाला आहे. हे बंधारे भरण्यास मदत झाली आहे.