वाळूचा लिलाव नसतानाही  अवैधरीत्या उपसा सुरूच 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 6 जून 2018

वाळूचा लिलाव नसतानाही 
अवैधरीत्या उपसा सुरूच 

जळगावः आव्हाणे (ता. जळगाव) येथील गिरणा नदीपात्रातील वाळू गटाचा लिलाव झालेला नसताना सरपंचपुत्राच्या सहमतीने दररोज 150 ट्रॅक्‍टरभर वाळू उपसा होत आहे. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होऊन भविष्यात आव्हाणे गावात पाणीटंचाईची भीती निर्माण झाली आहे. महसूल विभाग यावर काय कारवाई करतो, याबाबत नागरिकांचे लक्ष लागून आहे. 

वाळूचा लिलाव नसतानाही 
अवैधरीत्या उपसा सुरूच 

जळगावः आव्हाणे (ता. जळगाव) येथील गिरणा नदीपात्रातील वाळू गटाचा लिलाव झालेला नसताना सरपंचपुत्राच्या सहमतीने दररोज 150 ट्रॅक्‍टरभर वाळू उपसा होत आहे. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होऊन भविष्यात आव्हाणे गावात पाणीटंचाईची भीती निर्माण झाली आहे. महसूल विभाग यावर काय कारवाई करतो, याबाबत नागरिकांचे लक्ष लागून आहे. 
आव्हाणे येथे वत्सलाबाई मोरे आरक्षित जागेवर सरपंच म्हणून चार वर्षांपूर्वी निवडून आल्या होत्या. त्यांचा पुत्र पंचायत समितीचे माजी सभापती सुनील मोरे हेच सरपंच म्हणून गावात कार्यरत आहेत. ग्रामपंचायतीत सुनील मोरे यांचाच वावर असतो. 
 

पाण्यासाठी रात्री मोर्चा 
पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन दिले जात नसल्याने, त्यांनी गावात पाणीपुरवठा करण्याचे काम सोडले होते. यामुळे गावात पाणी असूनही कृत्रिम टंचाई निर्माण झाली होती. गेल्या रविवारी (3 जून) पाणीटंचाईला कंटाळून महिलांनी रात्री मोरे यांच्या घरावर हंडा मोर्चा काढला होता. तेव्हा सरपंचपुत्र मोरे वाळू व्यावसायिक, वाहतूकदारांसोबत नदीपात्रात "मद्याची पार्टी' करीत होते. जेव्हा त्यांना हंडा मोर्चाची घटना कळली, त्यांनी पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना पेमेंट देऊन लगेच पाणीपुरवठा करण्याचे "फर्मान' काढले. 

एकच वर्षामुळे वाळूचा मलिदा 
सरपंचपद आरक्षित जागेवर असल्याने मोरे यांना संधी मिळाली. आगामी काळात हे आरक्षण राहणार नाही, म्हणून आताच जो मलिदा मिळेल तो काढून घेत असल्याचे अनेक वेळा मोरे यांनी नागरिकांना सांगितले आहे. कोणी तक्रार केली तर ते अरेरावी करतात, अशाही नागरिकांच्या तक्रारी आहेत. आव्हाणे गावाच्या हद्दीतून जाणाऱ्या गिरणा नदीपात्रातून वाळूचा उपसा सुरूच आहे. विनापावती दररोज दीडशेवर ट्रॅक्‍टर वाळूचा उपसा होतो. खुद्द सरपंचपुत्र मोरे यांचे ट्रॅक्‍टर असल्याने गावात कोणी विरोध करीत नाही. यामुळे आव्हाणे येथील पर्यावरणाचा ऱ्हास होऊन शासनाचे आर्थिक नुकसानही होत आहे. जिल्हा गौण खनिज विभाग, महसूल अधिकारी या अवैध उपशावर काय कारवाई करतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे. 

नागरिक काय म्हणतात... 

हर्शल चौधरी (पंचायत समिती सदस्य, शेतकरी) ः गावातील नदीपात्रातून असा वाळू उपसा होत राहिल्यास भविष्यात गावाला पिण्यास पाणी मिळणार नाही. पाण्याने समृद्ध असलेल्या गावाला भविष्यात पाणी फाउंडेशनची मदत घ्यावी लागेल. 

मंगेश चौधरी ः लिलाव झालेला नसताना वाळूच्या उपशाला गावातील ज्येष्ठ नागरिकांनी विरोध केला नाही. यामुळे आमच्या पिढीला पाणी मिळणार नाही. पाण्याअभावी गाव सोडून नागरिकांचे स्थलांतर केव्हाही होऊ शकते. 
------------------------- 

सोनू पाटील ः आव्हाणे गावात नदीकाठी शेती आहे. चार वर्षांपूर्वी बोअरिंगचे पाणी बारामाही राहत असे. मात्र, गेल्या चार वर्षांपासून वाळूचा उपसा सतत होत आहे. यामुळे बोअरिंगची पातळी कमी झाल्याने पिकांना पाणी देता येत नाही. 

Web Title: upsa