उपसभापतीच्या दणक्याने अधिकारी 'रस्त्यावर'!

Upsabhapati protest against panchayat samiti officers
Upsabhapati protest against panchayat samiti officers

येवला : अनेकदा विनवण्या करूनही दाद न देणाऱ्या अधिकाऱ्यांनी गवंडगांव परिसरातील रस्त्यांप्रश्नी जागेवर येत रखडलेल्या कामांना चालना देण्याचे लेखी आश्वासन दिले. या मागणीसाठी पंचायत समितीचे उपसभापती रुपचंद भागवत यांनी ग्रामस्थांसह उपोषणाचा दणका दिल्याने या विषयाला चालना मिळाली. दरम्यान, शिवसेना नेते संभाजीराजे पवार यांनी केलेली मध्यस्थी व ठोस आश्वासन मिळाल्याने भागवत यांनी आज दुसऱ्या दिवशी उपोषण मागे घेतले. 
गवंडगांव परिसरातील देवठाण, देवळाणे, गारखेडे, तळवाडे शिवरस्ता, तळवडे रेलवे गेटपर्यंत जाणाऱ्या सर्व रस्त्यांची चाळण झाली आहे.

यामुळे ग्रामस्थांची हालअपेष्ठा सुरु असल्याने सातत्याने मागणी केली. मात्र दखल होत नसल्याने उपसभापती भागवत यांनी रस्त्यावरच भास्कर भागवत छगन भागवत, राजेंद्र जाधव, सोन्याबापू भागवत, अशोक भागवत, रामदास भागवत, मनोज भागवत, सागर गायकवाड या ग्रामस्थासह उपोषण सुरु केले होते. पहिल्या दिवशी प्रांताधिकारी भीमराज दराडे यांनी चर्चा केली तर तहसीलदार नरेशकुमार बहिरम, गटविकास अधिकारी सुनील आहिरे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी भेट देऊन चर्चा केली मात्र ठोस कार्यवाहीची मागणी करत उपोषण मागे घेतले नव्हते.

आज दुसऱ्या दिवशी शाळा बंद ठेवत ग्रामस्थ आक्रमक झाले होते. त्यामुळे दुपारी शिवसेना नेते संभाजीराजे पवार, तालुकाप्रमुख रतन बोरनारे आदींनी यशस्वी मध्यस्थी केली व जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे उपअभियता वाघ यांनी कार्यवाही करण्याचे पत्र भागवत यांना दिल्याने उपोषणावर तोडगा निघाला. यावेळी प्रविण गायकवाड, कांतीलाल साळवे, वाल्मिक गोरे, विठ्ठल आठशेरे, संजय पगारे, अरुण देवरे, देविदास गुडघे, बापू गायकवाड, वाल्मिक मगर, बाबासाहेब आहेर, प्रथमेश पगारे आदि उपस्थित होते.

असे मिळाले आश्वासन

गवंडगाव ते गारखेडा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यासाठी प्रस्तावित करून काम तत्काळ केले जाईल, गवंडगाव-सुरेगाव-रेल्वे स्टेशन रस्ता रस्ते सूचित नाही, मात्र दुरुस्तीसाठी प्रस्तावित केले जाईल. गवंडगाव ते देवठाण रस्ता जिल्हा परिषदेकडे असल्याने पुढील आर्थिक वर्षात प्राधान्याने काम केले जाईल, तर गवंडगाव ते देवठाण रस्याचा प्रस्ताव तत्काळ तयार करून मंजुरीला पाठवला जाईल असे आश्वासन भागवत यांना या पत्रात देण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com