धुणीभांडी करून उर्मिलाने मिळवले 82 टक्के गुण            

राजेंद्र बच्छाव
बुधवार, 30 मे 2018

इंदिरानगर (नाशिक) : येथील सुखदेव कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेत धूण्याभांड्याचे काम करून 82 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवलेली उर्मिला प्रजापती या विद्यार्थिनीची यशोगाथा प्रेरणादायी आहे. राजीवनगर वसाहतींमध्ये 8 बाय 8 च्या खोलीत ती वडील शाहुराम, आई हीराबाई मोठी बहिण पूनम आणि दोन लहान बहिणी चंद्रकला आणि ऐश्वर्या सोबत ती राहते.

कोणतीही खासगी शिकवणी नाही किंवा कोणाचेही वैयक्तिक मार्गदर्शन नाही अशा परिस्थितीत शाळेचे शिक्षक, प्राचार्य आणि संस्थेच्या सहकार्याने तिने संपूर्ण घरी राहून अभ्यास करत हे यश मिळवले आहे. घरची परिस्थिती हालाखीची असल्याने पाच घरातील धुणीभांडी करून स्वतःच्या शिक्षणाचा खर्च तर ती उचलत होतीच शिवाय संसाराचा गाडा हाकणाऱ्या आई वडिलांना आर्थिक मदत देखील करत होती.

उर्मिलाचे वडील आणि आई दोघेही अशिक्षित असून मजुरीचे काम करतात. परीक्षेच्या काळात देखील उर्मिलाने तिच्या कामातून सुट्टी घेतली नव्हती हे विशेष. दोघा लहान बहिणींना शिकवून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे आणि स्वतः वाणिज्य शाखेतच लेखापरीक्षक अथवा राज्य तसेच केंद्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊन तिला अधिकारी होण्याची इच्छा आहे. प्राचार्य खरोटे आणि शिक्षक तीचे अभिनंदन करण्यासाठी गेले असता ती नेहमीप्रमाणे कामासाठी गेली होती लहान बहिणीने तिला घरी बोलाऊन आणले. मात्र रोज बुडेल म्हणून तिचे पालक आपापल्या कामावर गेले होते.

Web Title: urmila got 82 percent when she is working as a housekeeper