शिरपूरला फटाक्यांमुळे दुकानास आग, एक जण गंभीर

सचिन पाटील
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

शिरपूर - धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे पाचकंदिल भागात आज सायंकाळी सहाच्या सुमारास फटाक्याच्या दुकानास आग लागली. यात शेजारी असणारे इलेक्ट्राॅनिक्सचेही दुकान आगीत खाक झाले.

शिरपूर - धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे पाचकंदिल भागात आज सायंकाळी सहाच्या सुमारास फटाक्याच्या दुकानास आग लागली. यात शेजारी असणारे इलेक्ट्राॅनिक्सचेही दुकान आगीत खाक झाले.  या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे.

सायंकाळी सहाच्या सुमारास लक्ष्मीपूजनाचा विधी सुरू होता. त्यावेळी आतषबाजी सुरू झाली. एक ठिणगी फटक्‍याच्या दुकानावर उडाली. त्यामुळे फटाक्‍याच्या दुकानास आग लागली. या आगीत इलेक्‍ट्रॉनिक्‍सचे दुकानही खाक झाले. 

शिरपूरला श्री खंडेराव मंदिर परिसरात फटाके विक्रीसाठी परवानगी देण्यात आली. मात्र, पाचकंदिल परिसरात एकाने अवैधरीत्या फटाक्‍याचे दुकान थाटले. बांबू, पत्राच्या साहाय्याने तात्पुरत्या स्वरूपातील दुकानात फटाके विक्री होते. लक्ष्मीपूजनानंतर झालेल्या आतषबाजीत एक ठिणगी या फटाक्‍याच्या दुकानात उडाली आणि आग सुरू झाली. फटाक्‍यांमुळे आग पसरली आणि तिने लगतच्या इलेक्‍ट्रॉनिक्‍सच्या दुकानाला विळख्यात घेतले. आग वाढत गेल्याने इलेक्‍ट्रॉनिक्‍सच्या दुकानातील फ्रिज अक्षरशः सहा फुटापर्यंत उडाले.

श्री खंडेराव मंदिर परिसरात सुरक्षिततेसाठी असलेला अग्निशमन बंब तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला. फटाक्‍यांमुळे आणि दोन दुकाने आगीच्या विळख्यात असल्याने नेमक्‍या नुकसानीचा अंदाज यंत्रणेला घेता आला नाही. तसेच नेमके नुकसान काय झाले? याचाही अद्याप अंदाज बांधता आलेला नाही. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला काही नागरिकांनी तातडीने रुग्णालयात नेल्याने संबंधिताचे नाव समजू शकलेले नाही. स्थानिक सरकारी यंत्रणेने मदतकार्याला वेग दिला

Web Title: Uttar Maharashtra News fire in Shirpur Pach Kandil region