भीमा-कोरेगाव घटनेचे जळगाव जिल्ह्यात पडसाद 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जानेवारी 2018

जळगाव - भीमा-कोरेगाव येथे सोमवारी झालेल्या दोन गटांतील धुमश्‍चक्रीनंतर या घटनेचे राज्यभरात पडसाद उमटत असताना जळगाव जिल्ह्यातही त्याचे पडसाद उमटले. जळगावात सोमवारी रात्री दलित संघटनांची बैठक होऊन आज सकाळी समाज मंडळातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. घटनेचा निषेध नोंदवत या घटनेची सीआयडी यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली.

शौर्यदिनानिमित्त भीमा-कोरेगाव येथे सोमवारी हजारो भीमसैनिक जमले होते. त्याठिकाणी दोन गटांत धुमश्‍चक्री उडाल्याने तणाव निर्माण झाला. काही जातीयवादी संघटना यामागे असून त्यांनीच दलितांवर हल्ला केल्याचा आरोप या मोर्चात दलित नेत्यांनी केला. या घटनेची तातडीने सीआयडी चौकशी करावी, अन्यथा अन्यायाविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला. दलित संघटनांमधील महिला पदाधिकाऱ्यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. दरम्यान, दलित संघटनांची यासंदर्भात दुपारी पुन्हा एक बैठक आयोजित केली असून त्यात पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. तसचे जिल्ह्यातील अमळनेर शहरात महामंडळाची बस फोडण्यात आल्या असून, तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

धुळ्यात दुसऱ्या दिवशीही पडसाद 
भीमा- कोरेगाव येथील घटनेचे पडसाद धुळे शहरात आज दुसऱ्या दिवशी देखील उमटले. सोमवारी रात्री तणावाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर आज सकाळी भीमनगर भागात रास्तारोको करण्यात आला. तसेच महाराणा प्रताप चौक परिसरात दुकाने बंद पाडण्यात आली असून, या साऱ्या प्रकारामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बसफेऱ्या देखील रद्द करण्यात आल्या. 

Web Title: uttar maharashtra news: jalagaon agitation