वंचितच्या दहा हजार मतांनी आणला पोटात गोळा! 

vanchit
vanchit

येवला : कोण कुठले बापू बर्डे.. अनेकांना माहीतही नाही परंतु केवळ वंचित आघाडीचे उमेदवार म्हणून तालुक्यातील जनतेने भरभरून मते देत तब्बल दहा हजार 833 मतांचे दान केले आहे. तिसऱ्या क्रमाकांची ही मते वास्तविक कुणालाही बेदखल करण्यासारखी नसून विधानसभेसह आगामी राजकारणाच्या दृष्टीने पक्षीय नेत्यांनी धसका घेतला आहे. यापुढील काळात वंचितला दुर्लक्षीत करणे महागात पडेल हे नक्की!  

येवला लासलगाव मतदारसंघ तसा राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. भाजपाचेही आता बऱ्यापैकी प्रस्थ वाढत आहे तर काँग्रेस गेल्या काही वर्षांत चाचपडताना दिसतेय. अशा राजकीय समीकरणात लोकसभा निवडणुकीत अजून एक मते खेचणारा पक्ष उदयास आला आहे तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी. वास्तविक या पक्षाचे उमेदवार असलेले बर्डे मतदारसंघात कुठे आणि कितीदा आले हाच प्रश्न आहे. तरीही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर प्रेम करणाऱ्या आणि वंचितचे संस्थापक प्रकाश आंबेडकरांना मानणाऱ्या तालुक्यातील मोठ्या संख्येने मतदारांनी डोळे झाकून आपली मते वंचितच्या पारड्यात टाकले.यामुळेच बर्डे यांना विक्रमी मते मिळाली आहे. विशेष म्हणजे मागील विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराला एवढी मते मिळाली नव्हती.

दलित समाज बांधवांची मतदान अधिक असलेल्या बुथवर त्यांना सर्वाधिक मते मिळाली.पाच-सहा बूथवर तर भाजपाच्या भारती पवार व राष्ट्रवादीचे धनराज महाले यांच्यापेक्षा बर्डे यांना अधिक मते मिळाली आहे. मात्र वंचित आघाडी व एमआयएमची युती मतातून फारशी चमकली नसल्याचे आकडे सांगतात. येथील भाऊसाहेब अहिरे, भाऊसाहेब जाधव, जयप्रकाश वाघ, भानुदास पठारे, संतोष खरे, लखन पगारे, विलास देहाडे, विरेश घोडेराव, गौतम घोडेराव, समाधान धिवर, अविनाश धिवर, रवि संसारे, विरेश घोडेराव, संदिप जोंधळे, सविता धिवर, अंजनाबाई घोडेराव आदींनी प्रचारात सक्रीय होत वंचितची धुरा सांभाळली. बाहेरील असूनही बर्डे यांनी तिसऱ्या क्रमांकाची मते मिळवली असून स्थानिक उमेदवार असल्यास काय होईल असा विचार प्रस्थापितांना पडला आहे.वंचितला गेलेली मते राष्ट्रवादीसह शिवसेना व भाजपची असल्याने पुढील राजकीय समीकरणाच्या दृष्टीने इच्छुक आत्ताच धसका घेत असून राजकीय समीकरणांच्या जुळवाजुळवी साठी लागलेले दिसत आहे. 

“कोणतीही मोठी पुर्व तयारी व आर्थिक पाठबळ नसतांनाही ज्याताकदीने दलित, मुस्लिम, धनगर, आलुतेदार, बलुतेदार मते एकवटली. ही मते आगामी विधानसभा निवडणुकीत निर्णयाक भूमिका बजावतील हे दाखवून दिले आहे.”
- भाऊसाहेब आहिरे, तालुकाध्यक्ष भारिप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com