#MarathaKrantiMorcha वणी येथे स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जुलै 2018

कार्यकर्ते येथील पोलिस ठाण्यात एकत्र येत आरक्षण व विविध मागण्यांचे  निवेदन वणीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रंगनाथ सानप यांना दिले. यानंतर कार्यकर्त्यांनी गावातील प्रमुख रस्त्याने निषेधाचा काळा झेंडा हाती घेत मूक मोर्चा काढला.

वणी (नाशिक) : वणी परीसरातील सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी बुधवारी पुकारलेल्या बंदला येथील व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळला.

सोमवारी काकासाहेब शिंदे या तरुणाने गोदावरी नदीच्या पात्रात उडी मारली. यात काकासाहेब शिंदे यांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर मराठा संघटनांनी आज नाशिक जिल्हा बंदचे आव्हान केले होते. त्यानुसार येथील व्यवसायिकांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने बंद ठेवून बंदमध्ये सहभाग घेतला. 

दरम्यान सकाळी १०. ३० वाजता कार्यकर्ते येथील पोलिस ठाण्यात एकत्र येत आरक्षण व विविध मागण्यांचे  निवेदन वणीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रंगनाथ सानप यांना दिले. यानंतर कार्यकर्त्यांनी गावातील प्रमुख रस्त्याने निषेधाचा काळा झेंडा हाती घेत मूक मोर्चा काढला.

मोर्चाची सांगता कळवण-सापुतारा त्रिफुलीवर बिरसा मुंडा चौकात झाली. यावेळी उपसरपंच विलास कड, ओझरखेडचे सरपंच गंगाधर निखाडे, ग्रामपंचायत सदस्य मनोज थोरात, राकेश थोरात यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आरक्षण व समाजाच्या विविध मागण्यांबाबत मनोगत व्यक्त करीत सरकारने मागण्या मान्य केल्यास समाजाच्या वतीने लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला.

मोर्चाची सांगतादरम्यान उपस्थितांच्या वतीने काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बंददरम्यान गावातील इंग्लिश मीडियम स्कूल, रिक्षा तसेच गावातील सर्व संघटना सहभागी झाल्या होत्या. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. 

Web Title: Vani Bandh with non force bandh