वणीतील 'या' शाळेला मिळाले यूनेस्को स्कूल क्लबचे सदस्यत्व

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

वणी  : यूनेस्को स्कूल क्लबचे सदस्यत्व मिळणारी  के.आर. टी. हायस्कूल ही जिल्ह्यातील पहिली माध्यमिक शाळा म्हणून ठरली आहे. नुकतेच विद्यालयास युनेस्कोच्या दिल्ली येथील राष्ट्रीय केंद्राकडून सदस्यत्वाचे प्रमाणपत्र बहाल करण्यात आले.  या सदस्यत्वामुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील आधुनिक शिक्षण पद्धतीचा अध्यापनात अवलंब करता येणार असून, गुणवत्ता वाढीला चालना मिळणार आहे. 

वणी  : यूनेस्को स्कूल क्लबचे सदस्यत्व मिळणारी  के.आर. टी. हायस्कूल ही जिल्ह्यातील पहिली माध्यमिक शाळा म्हणून ठरली आहे. कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूल हे विद्यालय  विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला चालना देण्यासाठी  गुणवत्ते बरोबरच नेहमी नवनवीन उपक्रम राबवत असते. त्यासाठी मविप्र संस्थेचे संचालक दत्तात्रेय पाटील यांच्या संकल्पनेतून व शालेय समिती प्रमुख विलास कड, सर्व स्कूल कमिटी सदस्य यांच्या सहकार्याने शाळेतील मुख्याध्यापक डी. बी. चंदन यांच्या कुशल नियोजनातून अनेक उपक्रम सहकारी शिक्षकांच्या मदतीने शाळेत नेहमी राबवले जातात. तालुका, जिल्हा, राज्य, व देश पातळी वरील स्पर्धेमध्ये भाग घेत असते.  युनेस्को आंतरराष्ट्रीय स्कूल क्लबचे सदस्यत्वचे नुकतेच विद्यालयास युनेस्कोच्या दिल्ली येथील राष्ट्रीय केंद्राकडून सदस्यत्वाचे प्रमाणपत्र बहाल करण्यात आले. 

गुणवत्ता वाढीला मिळणार चालना

नाशिक जिल्ह्यातील खाजगी माध्यमिक विभागांमधील युनोस्को क्लब सदस्य होण्याचा बहूमान केआरटी हायस्कूल वणीने पटकावला. यासाठी मुख्याध्यापक डी. बी. चंदन यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील उपक्रमशील शिक्षक प्रवीण पानपाटील यांनी यासाठी प्रयत्न केले. या सदस्यत्वामुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील आधुनिक शिक्षण पद्धतीचा अध्यापनात अवलंब करता येणार असून, गुणवत्ता वाढीला चालना मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या युनोस्को या संस्थेकडून जागतिक स्तरावर विद्यार्थ्यांनां शैक्षणिक मार्गदर्शन व शैक्षणिक उपक्रमांचे आदान-प्रदान करून त्यांची गुणवत्ता वाढ होण्यासाठी उपक्रम राबवले जाणार आहेत. युनेस्कोचे सभासदत्व असणाऱ्या प्रत्येक देशात यासाठी स्वतंत्र यंत्रणा असून त्या-त्या देशातील शिक्षण पद्धतीचा अभ्यास करून उपक्रम सुचवले जातात. दरम्यान संस्थेच्या  सरचिटणीस निलीमा पवार, अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, सभापती माणिकराव बोरस्ते व मविप्रचे सर्व संचालक मंडळ आदींनी शाळेचे  मुख्याध्यापक चंदन, प्रविण पानपाटील आणि शाळेतील सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vani krt school got unesco membership