वणीजवळ अपघातात नगर जिल्ह्यातील तिघे ठार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 जून 2017

वणी - वणी-नाशिक मार्गावरील लखमापूर फाटा येथे गुरुवारी पहाटे मोटार झाडावर आदळून झालेल्या दुर्घटनेत नगर जिल्ह्यातील तिघे जण जागीच ठार झाले, तर एक जण जखमी झाला.

वणी - वणी-नाशिक मार्गावरील लखमापूर फाटा येथे गुरुवारी पहाटे मोटार झाडावर आदळून झालेल्या दुर्घटनेत नगर जिल्ह्यातील तिघे जण जागीच ठार झाले, तर एक जण जखमी झाला.

छगन जानकू कांडेकर (वय 30), मंगला बबन कांडेकर (वय 45) आणि आशा रावसाहेब गावडे (वय 47) अशी मृतांची नावे असून, ते सर्व जण वाकोडी फाटा (ता. जि. नगर) येथील रहिवाशी होते. या अपघातात नवीन बबन कांडेकर (वय 22) व मनीष भाऊसाहेब गवळी (वय 23) जखमी झाले आहेत. हे सर्व जण मोटारीतून काल (ता.14 ) रात्री अहमदाबाद येथून वाकोडी फाटा येथे निघाले होते. आज पहाटे साडेचारला त्यांची मोटार लखमापूर फाटा येथे एका झाडावर आदळली. मोटार रात्रभर चालविल्याने चालकाला डुलकी लागल्याने ताबा सुटून मोटार झाडावर आदळल्याचे पोलिसांनी सांगितले. वणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात पाठविले. अपघातातील जखमींना उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे.

Web Title: vani nashik news three death in accident