Sagar Kacchava
Sagar KacchavaSakal

वरखेड्याच्या गरीब मुलावर आपबित्ती; उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन

वरखेडे (ता. चाळीसगाव) येथील सागर कच्छवा या तरुणाला बोननँरो या दुर्धर आजाराने ग्रासलेला आहे.या आजाराला कुठलेही शासकीय अनुदान नाही व तशी तरतुद नाही.
Summary

वरखेडे (ता. चाळीसगाव) येथील सागर कच्छवा या तरुणाला बोननँरो या दुर्धर आजाराने ग्रासलेला आहे.या आजाराला कुठलेही शासकीय अनुदान नाही व तशी तरतुद नाही.

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) - वरखेडे (ता. चाळीसगाव) येथील सागर कच्छवा (Sagar Kachhava) या तरुणाला बोननँरो (Bonenarrow) या दुर्धर आजाराने (Sickness) ग्रासलेला आहे. या आजाराला कुठलेही शासकीय अनुदान (Subsidy) नाही व तशी तरतुद नाही. ऑपरेशन करण्यासाठी सुमारे 20 लाख रुपये खर्च येणार असून त्यासाठी समााजातील दानशूरांनी पुढे येवून आर्थिक मदत (Economic Help) करावी असे आवाहन वरखेडे येथील ग्रामस्थांनी केले आहे.

घराची परिस्थिती हालाखीची

सागर कच्छवा याची घरची परिस्थिती अतिशय हालाखीची आहे.वडील हयात नसून आई व वडिल बंधू रोजंदारीने काम करून कुटुंबाची गुजराण करतात. सागर याची घरची परिस्थिती गरीबीची असली तरी हे कुटुंब अतिशय मनमिळावू आहे. मिळेल ती कामे करून संसाराचा गाडा ढकलत आहेत. सागर याने देखील गावातच तीन चार महिन्यापासून छोटीसी चहा तसेच पाववड्याची गाडी टाकून स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी धडपड करीत होता. दोन पैसा गाठीशी येवू लागला होता.

नियतीला बघवले नाही. अचानक

सागरला दुर्धर अशा बॅननॅरो अशा आजाराने गाठले. ह्या आजारावर मोठा खर्च आहे आणि त्याबाबत कुठलेली शासकीय मदत मिळत नाही. त्यामुळे त्याच्या आईसमोर उपचाराचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्याच्या आजारावरील उपचारासाठी नागरीकांना मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, व्हाँटस्प ग्रुपच्या माध्यमातून आर्थिक मदत होत असली तरी आपल्या परीने जेवढी मदत करता येईल तेवढी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

जयंतीचा निधी उपचारासाठी दिला

गावातील तरुणावर आपबित्ती कोसळल्याने वरखेडे येथील तरूण मंडळींनी यावर्षी चितोड नरेश महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमीत्ताने स्वत:च्या व लोकवर्गणीतून जमा होणाऱ्या पैशाचा विनियोग हा सागर कच्छवा याच्या उपचारासाठी करण्याचा अत्यंत स्तुत्य असा निर्णय घेतला आहे. गावात फिरून ही मदत गोळा करून सागरला उपचारासाठी ती सुपुर्द केली जाईल. युवकांच्या या भूमिकेचे समाजमनातून कौतुक होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com