वरणगाव पालिकेत नगराध्यक्ष एकाकी 

वरणगाव पालिकेत नगराध्यक्ष एकाकी 

वरणगाव : पालिकेची सर्वसाधारण सभा  झाली. यावेळी २२ विषय मंजूर करण्यात आले. सभेत भाजप खडसे गट आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या नगरसेवकांनी एकत्र येऊन काही विषयांना कडाडून विरोध केल्याने काहीवेळ गोंधळ निर्माण झाला असता, नगराध्यक्ष एकाकी पडल्याचे चित्र निर्माण झाले होते. 

पालिकेच्या सभागृहात आयोजित या सभेला नगराध्यक्ष सुनील काळे अध्यक्षस्थानी होते. तर मुख्याधिकारी श्यामकुमार गोसावी, उपनगराध्यक्ष शेख अखलाक, नगरसेवक राजेंद चौधरी, रवि सोनवणे, गणेश चौधरी, विष्णू खोले, सुधाकर जावळे, बबलू माळी, गणेश धनगर, विकीन भंगाळे, विनोद चौधरी, नगरसेविका अरुणा इंगळे, रोहिणी जावळे, जागृती बढे, मेहनाजबी पिंजारी, नरसीमबी कुरेशी, माला मेढे, प्रतिभा चौधरी, शशी कोलते, वैशाली देशमुख उपस्थितीत होते. यावेळी सभेसाठी ४० विषय ठेवण्यात आले होते. परंतु काही विषयांमध्ये सभेसमोर मंजुरी न घेता, निविदा काढण्यात आल्या व कार्यारंभ आदेश देण्यात आले. टिप्पणी मध्ये मुख्याधिकारी यांनी या विषयाला मंजुरी द्यावी, अशा प्रकारचे टिपणी दिल्याने यावेळी सर्व नगरसेवक एकीकडे तर नगराध्यक्ष व मुख्याधिकारी बाजूला पडल्याचे निदर्शनास आले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com