उत्तरांची फटकेबाजी अन्‌ रोहितच्या भेटीचे ‘गिफ्ट’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

जळगाव - अदिदास स्पोर्टस कंपनीने जाहीर केलेल्या योजनेत मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा फॅन्स क्‍लबच्या माध्यमातून करण्यात आलेल्या रोहीतच्या देशभरातील लाखो चाहत्यांमधून जळगावच्या वरुणराज नन्नवरेची निवड झाली. त्यानेही रोहीतच्या फटक्‍यांबाबत कृतीसह अचूक उत्तर दिल्याने त्याला थेट रोहित शर्माच्या भेटीचे ‘गिफ्ट’ मिळाले. मुंबईतील लोअर परेल येथील एका हॉटेलमध्ये झालेल्या भेटीने वरुण कमालीचा खूष झाला. 

अदिदास कंपनीच्या वतीने रोहित शर्माच्या देशभरातील चाहत्यांमधून आठ जणांची निवड झाली, त्यात काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी वरुणराज राजेंद्र नन्नवरे याचाही समावेश आहे. आगामी चॅम्पियन्स चषकासाठी संघाला शुभेच्छा देण्याच्या दृष्टीने तयार होणाऱ्या माहितीपटासाठी रोहीतच्या या आठ ‘लकी’ चाहत्यांना मुंबईत बोलाविण्यात आले. मात्र, रोहित शर्माच्या भेटीबद्दल कमालीची गोपनीयता पाळण्यात आली. 

..अन्‌ भेटीचा सुखद धक्का
वरुणला एका हॉटेलातील खोलीत नेण्यात आले, त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात आली. रोहित शर्माच्या आवडत्या फटक्‍यांबद्दल त्याला कृतीसह माहिती विचारण्यात आली. वरुणने पूल शॉट व स्क्वेअर कट असे अचूक उत्तर दिल्यानंतर त्याच्या डोळ्यांवरील पट्टी काढण्यात आली. समोर बघितल्यावर बघतो तर काय... वरुणसमोर प्रत्यक्ष रोहित शर्मा होता. त्यानेच हे प्रश्‍न त्याला विचारले व अचूक उत्तर दिल्यानंतर त्याला रोहीतच्या भेटीचा सुखद धक्का बसला.

Web Title: Varunraj nannaware seletion