वीरपत्नी म्हणाल्या, जातीय तणाव वाढवू नका

nashik.
nashik.

नाशिक  : काश्मीरमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेतील हुतात्मा स्कॉड्रन लीडर निनाद अनिल मांडवगणे यांच्या पार्थिवावर आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार झाले. यावेळी हुतात्मा निनादच्या वीरपत्नी विजेता माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, की जर देशावर प्रेम असेल, सैनिकांनी निर्धास्तपणे सीमेवर ड्युटी करावी, असे वाटत असेल तर जातीय तणाव वाढवू नका. देशासाठी जबाबदारीने वागा.

भारतीय वायुसेनेचे स्कॉड्रन लिडर निनाद दोन दिवसांपूर्वी काश्मीरमध्ये सीमेनजीक हेलीकॉप्टर दुर्घटनेत हुतात्मा झाले. त्यांच्या पार्थिवावर आज पंचवटी अमरनाथ येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार झाले. यावेळी त्यांना दवाईदलातर्फे मानवंदना देण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने नागरीक, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील उपस्थिती होती. यावेळी वीरपत्नी विजेता माध्यमांशी बोलल्या. 

त्या म्हणाल्या, की आपल्याला खरोखर निनाद यांना मानवंदना द्यायची असेल तर एक करा. आपल्या कुटुंबातील एकाला सैन्यात दाखल करा. ते शक्य नसेल तर जबाबदारीने वागा. सैनिक व्हाटसअॅप आणि सोशल मिडीयावर संदेश पाहू शकत नाहीत. तेव्हा देशाच्या हितासाठी जातीय तेढ वाढेल असे काहीही करू नका. लहान लहान गोष्टी करता येतील. आजुबाजुला स्वच्छता ठेवा. उघड्यावर घाण करू नका. महिला, मुलींची टवाळी करू नका. सैनिक तेव्हाच सीमेवर विश्वासाने ड्युटी करू शकेल जेव्हा त्याला आपले कुटुंब सुरक्षित व निर्धास्त आहे, याची त्यांना खात्री असेल. तेव्हा लहान लहान गोष्टी देशासाठी करा. समाज सुरक्षित राहील असे वागा. जबाबदारीने समाजात वागा म्हणजे सैनिक निर्धास्त राहतील.

यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन,  महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे,  उपमहापौर प्रथमेश गिते,  वायुसेनेचे एन. शिवसागर,  परवीन कौर, एअर कमांडर समीर बोराडे, स्टेशन कंमांडर ब्रिगेडियर पी. रमेश, सैनिक कल्याण मंडळ प्रमुख रत्नपारखी,  हदेश चव्हाण,  एन शिवसागर,  विशेष पोलिस महानिरीक्षक सी दोरजे,  रविंद्र वर्मा, महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या अश्वती दोरजे, एअर कंमोडर रवि शर्मा, पोलिस उपायुक्त लक्षमीकात पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भारतकुमार सुर्यवंशी उपस्थित होते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com