
Nandurbar News : नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुळे भाजीपाला मार्केटमध्ये आता नियमित्तपणे दिवसा दुपारी तीनला व पहाटे चारला भाजीपाला मार्केट सुरू राहणार आहे. (vegetable market will continue twice nandurbar news)
त्यामुळे शेतकऱ्यांनी विक्रीसाठी भाजीपाला आणावा, असे आवाहन माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, सभापती विक्रमसिंग वळवी यांनी केले आहे.
याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, की शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता एकाच वेळेस सुरू असलेल्या भाजीपाला मार्केटमुळे नाशवंत भाजीपाला सडून जातो.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यातच ग्रामीण भागातील अथवा इतर तालुक्यांतील शेतकरी व व्यापारी भाजीपाला विक्रीसाठी पहाटे लवकर येऊ शकत नाहीत, त्यांना सोयीचे व्हावे, शेतकऱ्यांचे भाजापील्याचे नुकसान टाळावे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासनाने निर्णय घेतला आहे.
नमूद वेळेत भाजीपाला मार्केट सुरू राहील, त्याचा लाभ शेतकरी, व्यापारी, अडते यांनी घ्यावा, तसेच कोणी अडथळा निर्माण करत असेल तर बाजार समितीचे सभापती विक्रमसिंग वळवी तसेच सचिव अमृतकर यांच्याकडे तक्रार करावी, असे आवाहन श्री. रघुवंशी यांनी केले आहे.