फावल्या वेळात मजुरांच्या मुलांना बनविले "स्कॉलर'! 

फावल्या वेळात मजुरांच्या मुलांना बनविले "स्कॉलर'! 

फावल्या वेळात मजुरांच्या मुलांना बनविले "स्कॉलर'! 


 
जळगाव  शाळेत येणारा विद्यार्थी चांगला घडावा, यासाठी प्रत्येकाकडे वैयक्‍तिक लक्ष देऊन पाठ गिरविले जातात. यासाठी विद्यार्थ्यांकडून चांगले पाठांतर करून घेणारे शिक्षकही आहेत. पण या पलीकडे जाऊन आपल्या शाळेतील किंवा गावातील नसलेल्या विद्यार्थ्याला शाळेच्या व्यतिरिक्‍त वेळ देऊन नवोदय परीक्षेचे धडे दिले, यात यश मिळाले. पण हे यश अन्य विद्यार्थ्यांना घडविण्याचा मार्ग दाखविणारे ठरले. यामुळे मजुरांच्या आठ मुलांना "नवोदय'ला पाठविण्याचे कार्य जिल्हा परिषद शाळेतील स्वप्नील पाटील या शिक्षकाने केले. 
जिल्हा परिषद शाळा कढोली (ता. एरंडोल) येथे सध्या स्वप्नील पाटील हे कार्यरत आहेत. वाकटुकी (ता. धरणगाव) येथे 2005 मध्ये ते शिक्षक म्हणून रुजू झाले. मुळात शिक्षण सुरू असताना स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू होती. यामुळे अभ्यासाचे तंत्र किंवा त्याबाबतचे ज्ञान स्वप्नील पाटील यांना होते. यामुळे आपल्याजवळील ज्ञान विद्यार्थ्यांच्या उपयोगी आणण्याच्या दृष्टीने वाकटूकी येथे "एमटीएस' परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यास सुरवात केली. येथे साधारण आठ वर्षांच्या सेवेत त्यांनी हे काम सुरूच ठेवले होते. परंतु, 2013 मध्ये सोनवदला शिक्षण घेणारा पाचवीतील रोहन पाटील याला "नवोदय'चे धडे देण्यास सुरवात केली. रोहन हा सोनवदहून रोज वाकटूकीला यायचा. याचे फलित म्हणून रोहनने "नवोदय'च्या पहिल्या यादीतच पात्र ठरला. स्वप्नील पाटील यांच्यासाठी हा नुसताच आनंद नव्हता, तर आणखी काही विद्यार्थ्यांना नवोदयला पाठविण्याची ऊर्मी देणारा क्षण होता. 

मजुरांची आठ मुले "नवोदय'ला 
वाकटुकी येथून नोकरीला सुरवात केल्यानंतर विद्यार्थ्यांना "नवोदय' परीक्षेचे धडे देण्यास सुरवात केली. यानंतर निंभोरा येथे बदली झाल्यानंतर काम बंद केले नाही. म्हणजेच 2013 ते 2018 या पाच वर्षांच्या कालावधीत स्वप्नील पाटील यांनी आठ विद्यार्थ्यांना नवोदयपर्यंत पोहचविले. शाळेच्या मधल्या सुटीत किंवा शाळा सुटल्यानंतर एक- दोन विद्यार्थ्यांकडून मोफत त्यांना नवोदयचे धडे देणे सुरूच ठेवले. यात 2014-15 मध्ये दोन, 2015-16 मध्ये तीन, 2016-17 मध्ये दोन आणि 2017-18 मध्ये एका विद्यार्थ्याला नवोदयसाठी पात्र ठरवून त्यांना भुसावळ येथे नवोदय विद्यालयात पाठविले. 


विद्यार्थ्यांना मदतीचा हात 
शिक्षणापलिकडे जाऊन स्वप्नील पाटील हे आर्थिक परिस्थिती नसलेल्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात देखील देतात. यात गरीब विद्यार्थ्यांना पुस्तके देतात. तसेच कढोली येथे शाळेतील ज्यांची परिस्थिती नाही, अशा दहा विद्यार्थ्यांना स्वखर्चातून टाय आणि बूट दिले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com