त्रयस्थ समितीमार्फत व्हावी कागदपत्रांची पडताळणी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

देऊर - शासनाच्या ग्रामविकास विभागाने राज्यस्तरावरून केलेल्या जिल्हा परिषद शाळांतील ऑनलाइन बदली प्रक्रियेतील त्रुटींमुळे धुळे जिल्ह्यातील 105 विस्थापित शिक्षकांना फटका बसला आहे. ऑनलाइन बदली प्रक्रियेत अनेक त्रुटी राहिल्या असून, यामुळे या शिक्षकांवर अन्याय झाल्याने त्यांनी या विरोधात न्यायालयात दाद मागितली आहे. 

#शिक्षकभरती 

सध्या धुळे जिल्ह्यात शिक्षक बदली प्रकरण विविध प्रकारे चर्चेत आले आहे. बहुतांश शिक्षकांनी चुकीची माहिती संवर्गात भरली आहे. त्यामुळे आपसांत तक्रारी दाखल होत आहेत. बदल्यांसाठी खोट्या कागदपत्रांचा आधार घेतला गेल्याने अशा शिक्षकांची तालुकानिहाय पडताळणी गटशिक्षणाधिकारी व संबंधित कर्मचारी करीत आहेत. मात्र, अन्याय झालेल्या 105 शिक्षकांनी कागदपत्रांची त्रयस्थ समितीमार्फत पडताळणी व्हावी, अशी मागणी केली आहे. ही मागणी कुठपर्यंत पूर्ण होते, याकडे लक्ष लागले आहे. 

या धबडग्यातच आंतरजिल्हा बदलीचे शिक्षकही जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यांनाही राज्यस्तरावरून ऑनलाइन गावे दिली जातील, असे चित्र आहे. शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन झाल्या आहेत. मग शिक्षण विस्ताराधिकारी, केंद्रप्रमुखांच्या बदल्या ऑफलाइन का, असा प्रश्‍नही विस्थापित शिक्षकांनी उपस्थित केला आहे. सर्वांना समान न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे. 

एक नजर त्रुटींवर 
- मंजूर शिक्षकपदापेक्षा शाळेत जादा शिक्षक हजर 
- सेवाज्येष्ठतेऐवजी सेवाकनिष्ठ शिक्षकाची बदली 
- पती- पत्नी जोडीपैकी एकाची बदली, तर दुसरा विस्थापित 
- विस्थापित झालेल्या पती- पत्नीला एकत्रीकरणाचा लाभ नाही 
- जिल्हा परिषद सोडून इतर विभागांतील जोड्यांना संवर्ग चारमध्ये एकत्रीकरणाचा लाभ नाही

Web Title: Verification of documents through third-party committee