Vidhan Sabha 2019 : शरद पवारांचे मन छोटे; पंतप्रधान मोदींची नाव न घेता टीका

टीम ई-सकाळ
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

जळगाव : विधानसभा निवडणुकीत आज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभांना सुरुवात झाली. आज, जळगावात पंतप्रधान मोदींची पहिली सभा झाली. त्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केले. पंतप्रधान मोदींनी पवार यांचे नाव न घेता त्यांना लक्ष्य केले. 

पंकजा मुंडे यांच्या सभेत गोंधळ

जळगाव : विधानसभा निवडणुकीत आज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभांना सुरुवात झाली. आज, जळगावात पंतप्रधान मोदींची पहिली सभा झाली. त्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केले. पंतप्रधान मोदींनी पवार यांचे नाव न घेता त्यांना लक्ष्य केले. 

पंकजा मुंडे यांच्या सभेत गोंधळ

शरद पवारांविषयी काय म्हणाले मोदी?
काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल होता. एका जाहीर सभेत पवार यांना फुलांचा हार घालण्यात येत होता. त्यावेळी हारामध्ये येण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका कार्यकर्त्याला शरद पवार यांनी कोपराने बाजूला केले होते. या व्हिडिओचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'मी आज एका महाराष्ट्रातील बड्या नेत्याचा व्हिडिओ पाहिला. आपल्याच व्यासपीठावर आपल्याच कार्यकर्त्याला हे बडे नेते बाजूला करत होते. ते नेते इतके मोठे आहेत. जग पाहिलं आहे. पण, एका कार्यकर्त्याला हारात घेण्याचं औदार्य मात्र त्या नेत्याला दाखवता आलं नाही. जो आपल्या कार्यकर्त्याचा सन्मान करत नाही. ते नेते तुमचा 
सन्मान काय करणार?'

हिंमत असेल तर, कलम 370 पुन्हा आणून दाखवा; मोदींचे विरोधकांना आव्हान

विरोधकांच्या नेत्यांच्या उल्लेखच नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संपूर्ण भाषणात विरोधी पक्षातील एकाही नेत्याचे नाव घेतले नाही. त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उल्लेख केला. पण, एकाही नेत्याचे नाव घेतले नाही. तिहेरी तलाक आणि कलम 370 हटविण्याच्या निर्णयाला दोन्ही पक्षांनी विरोध केल्याचा मुद्दा त्यांनी सांगितला. पण, एकाही नेत्याचे नाव घेतले नाही. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले

  1. महाराष्ट्रात 2022पर्यंत प्रत्येकाला घर देण्याचे आश्वासन पूर्ण करू
  2. नावात चुका असलेल्या शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवणार नाही
  3. महाराष्ट्रासह देशभरात प्रत्येक घराला नळाने पाणी देण्याचा संकल्प
  4. जळगावातूनच घराघरांत पाणी पोहचविण्याचा संकल्प जाहीर करतो 
  5. जळगावला जेएनपीटी बंदराशी थेट जोडणार; शेतकऱ्यांना फायदा होणार

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 pm narendra modi speech jalgaon statement on sharad pawar