भाजपला हरविणे हाच विरोधकांचा अजेंडा - खडसे

Eknath-Khadse
Eknath-Khadse

जळगाव - लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला जनतेने भरभरून यश दिले. राज्य सरकारने केलेल्या कामांमुळे आगामी विधानसभेतही भाजपला जनता मोठे यश देणार आहे. मात्र, विधानसभेत भाजपला हरविणे, हाच विरोधी पक्ष आणि मित्रपक्षाचाही अजेंडा असणार आहे. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकोप्याने काम करून विधानसभेत भाजपचे उमेदवार विजयी करण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन भाजप नेते व माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी केले. जळगाव येथे पक्षाच्या बैठकीत ते बोलत होते. 

श्री. खडसे म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामावर विश्‍वास ठेवून जनतेने भाजपला मोठ्या मताधिक्‍याने निवडून दिले आहे. मात्र, विधानसभेत हेच चित्र राहील या भरवशावर कार्यकर्त्यांनी राहू नये. पक्षाने पाच वर्षांत राज्यातील सत्तेच्या काळात केलेल्या कामांवर यश मिळणार आहे. गेल्या पाच वर्षांत राज्यातील सरकारने चांगली कामे केली आहेत. मराठा आरक्षणाचा सर्वांत मोठा प्रश्‍न सोडविला आहे. त्या शिवाय अनेक प्रश्‍न मार्गी लावले आहेत.

त्यामुळे भाजपचा जनाधार वाढला आहे. तरीही कार्यकर्त्यांनी सावध राहणे गरजेचे आहे. पक्षाचे यश पाहतात विरोधक आणि मित्रपक्ष यांचा आगामी विधानसभेत भाजपला हरविणे हाच एकमेव अजेंडा राहणार आहे. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सतर्क राहून एकोप्याने काम करण्याची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com