विधानसभेत विरोधकच शिल्लक राहणार नाही - गिरीश महाजन

Girish-Mahajan
Girish-Mahajan

नाशिक - लोकसभा निवडणुकीप्रमाणेच राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पन्नास जागाही निवडून येणार नाहीत. आघाडीतील अनेक नेते भाजपच्या संपर्कात आहेत. विरोधी पक्षनेते आमच्याकडे आले. त्यामुळे लोकसभेच्या निकालाप्रमाणे विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात विरोधक शिल्लक राहाणार नाही, असा दावा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज केला.

गंजमाळ येथील हॉटेल रॉयल हेरिटेजमध्ये भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या दोनदिवसीय बैठक सुरू आहे. बैठकीच्या समारोपाच्या सत्रानंतर माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी वरील मत व्यक्त केले. यावेळी महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

‘एक व्यक्ती एक पद’ धोरण अवलंबविणार
लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही विद्यमान आमदारांची तिकिटे कापणार का? या प्रश्‍नावर संबंधित लोकप्रतिनिधींची जनमानसातील प्रतिमा लक्षात घेऊन सूक्ष्म नियोजन करू, असे त्यांनी सांगितले. 

शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या प्रश्‍नावर पोलिस आयुक्तांशी संपर्कात असल्याचे एका प्रश्‍नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले. भाजप शहराध्यक्ष बदलाच्या चर्चेवर बोलताना ‘एक व्यक्ती एक पद’ हे धोरण अवलंबविण्यात येणार असून, त्याबाबत चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com