मेहुणबारे परिसरात बिबट्याचे दर्शन

दीपक कच्छवा
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : मागील वर्षी गिरणा परिसरात थैमान घातलेला नरभक्षक बिबट्याला ठार केल्यानंतर मेहुणबारे (ता.चाळीसगाव) शिवारात बिबट्याचे दर्शन घडले. या घटनेची माहिती वनविभागाला कळल्यानंतर कर्मचाऱ्यांनी पाहणी केली असता तेथे असलेले ठसे हे बिबट्याचे असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. उंबरखेडेनंतर तब्बल 33 दिवसांनी बिबट्याचे दर्शन झाले असून त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

मेहुणबारे येथील शेतकरी सुभाष राजपूत याची शेती वडगाव लांबे शिवारात आहे. ( ता. 9) रोजी केळीच्या पिकात बिबटया हा सुस्त पडलेल्या अवस्थेत दिसला. त्यानंतर तेथे असलेल्या मजुरांची एकच धांदल उडाली. या घटनेची माहिती मजुरांनी शेतमालकाला दिली. या घटनेची माहिती सुभाष राजपुत यांनी वन विभागाला कळविली. त्यानंतर काल सायंकाळी सहा वाजता वनविभागाचे प्रकाश पाटील व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. याठिकाणी पाहणी करून पायाचे ठसे हे बिबट्याचे असल्याचा संशय वनविभागाने व्यक्त केला आहे.

ट्रॅप कॅमेरे लावले

या भागात बिबट्या असल्याचा संशय वनविभागाला आला आहे. त्याच्या पायाच्या ठशांचा अंदाज घेऊन परिसरात चार ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. या भागात खरोखर बिबट्याचा वावर असेल तर या कॅमेऱ्यात नक्कीच ट्रॅप होईल, असा अंदाज वन विभागाने वर्तविला आहे.

मागील वर्षी नरभक्षक बिबट्याने सात निरपराध लोकांना ठार केले होते. त्यामुळे आजही बिबट्या आल्याचे शब्द कानावर जरी आले, तरी वरखडेकरांच्या उरात जणू काही धडकीच भरत असते.

33 दिवसानंतर बिबट्याचे दर्शन

मागील जुलै महिन्यात उंबरखेडे भागात बिबट्या व त्याचे बछडे एका झाडावर बसलेले दिसले होते. त्यानंतर तब्बल 33 दिवसांनी  या भागात बिबट्याचे दर्शन घडले. वनविभागाने या भागात पिंजरे लावावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. 

Web Title: View of the leopard in Mehunabare area