उबंरखेडे परिसरात बिबट्याचे दर्शन

दीपक कच्छवा
सोमवार, 9 जुलै 2018

मेहुणबारे(ता.चाळीसगाव) -  मागीलवर्षी गिरणा परिसरात थैमान घातलेल्या नरभक्षक बिबट्याला ठार केल्यानंतर उंबरखेड (ता. चाळीसगाव) शिवारात काही शेतमजुरांसह शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन घडले. या प्रकाराची माहिती वनविभागाला कळविल्यानंतर कर्मचार्यांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली असता त्यांना बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले. त्यामुळे या भागात बिबट्या असलेल्या वृत्तास वनविभागाने दुजोरा दिला.

गेल्या अनेक दिवसापासून बिबट्याची भीती नष्ट झाली. होती. मात्र उबंरखेडे- दडपिप्री शिवारातील अनिल पाटील यांच्या शेतात राहणाऱ्या दिपक भील याला त्याच्या घरापासून काही अंतरावर निंब आणि चिंचोलाच्या झाडावर ठिपके असलेला बिबट्या झाडावर बसलेला दिसला. त्याने शेतमालक अनिल पाटील यांना कळविल्यानंतर तेही तात्काळ शेतात आले. बिबट्याला पाहताच एकच धांदल उडाली. ते इतरांना बोलविण्याच्या आत बिबट्या ऊसाच्या शेतात निघून गेला. या प्रकारामुळे शेतात वास्तव्यास असलेले कुटंब खुपच घाबरले होते.

पिंजरा लावणार 
आज सकाळी नऊला वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मोरे यांना ही घटना समजताच त्यांनी वनपाल प्रकाश देवरे, वनरक्षक संजय जाधव यांना घटनास्थळी पाठवले.त्यांना बिबट्याचे पायाचे ठसे मिळुन आले. वन विभागाने ग्रामस्थांना काळजी घेण्याचे आवाहन केले. त्या ठीकाणी ग्रामपंचायतीची रितसर परवानगी घेवुन त्याठिकाणी पिंजरा लावण्यात येईल असे वन विभागाने सांगितले.

उंबरखेड शिवारात आमच्या कर्मचार्यांनी प्रत्यक्ष जाऊन पहाणी केली. प्रत्यक्षदर्शीनी दिलेली माहिती व चौकशी दरम्यान मिळुन आलेले ठसे यामुळे बिबट्याचे वास्तव दिसुन येत आहे. त्यामुळेच आमचे कर्मचारी या  भागात गस्त ठेवणार आहेत. शिवाय ग्रामस्थांना सावधतेच्या सूचना दिल्या आहेत. 
- संजय मोरे, प्रादेशिक वन परिक्षेत्र अधिकारी, चाळीसगाव

Web Title: View of the leopard in Umbarkhade area