गच्चीतून खाली पडणाऱ्या लेकीला वाचविणाऱ्या पित्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 एप्रिल 2018

नाशिक - कुटुंबातील एका मुलीवर अक्षदा टाकल्यावर त्याचदिवशी तिच्या काकावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ नाशिकरोडवर राहणाऱ्या गोदडे कुटुंबावर शुक्रवारी आली. पाचव्या मजल्यावरून पडणाऱ्या लेकीला वाचविताना गंभीर जखमी झालेले विजय किसन गोदडे (वय 38) यांचे काल रात्री उशिरा निधन झाले. त्यांच्यावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्याची वेळ दुपारी वऱ्हाडींवर आली.

नाशिकरोडवरील नेहमी गजबजलेल्या जयप्रकाश नगरच्या परिसरात आज सकाळी आनंदोत्सव; तर दुपारी सुन्न करणारी शांतता दिसली. या भागातील गोदडे कुटुंबाला एकाच दिवशी सुख-दुःखाच्या प्रसंगांना सामोरे जावे लागले. या कुटुंबातील एका मुलीचा आज विवाह होता. गुरुवारी (ता.26) चुलतबहिणीच्या हळदीचा कार्यक्रम सुनंदा गोदडे (वय 16) ही घराच्या पाचव्या मजल्यावरून पाहत होती. तिचा तोल गेला. ती खाली कोसळत असताना क्षणाचाही विलंब न करता विजय गोदडे यांनी लेकीला वाचविण्याचा प्रयत्न केला. सुनंदा नेमकी वडिलांच्या डोक्‍यावर पडली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले; पण त्यांची प्रकृती अधिकच गंभीर झाली. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना रात्री उशिरा त्यांचे निधन झाले. स्थानिक युवकांनी प्रसंगावधान राखत सकाळी विवाह पार पाडला. नवरीची पाठवणी केल्यानंतर काही वेळातच दुपारी विजय गोदडे यांच्यावर अंत्यसंस्कार केले.

सकाळी अक्षदा; दुपारी अंत्यसंस्कार
घरात पुतणीचा विवाह होत असताना त्याचदिवशी चुलत्याला निरोप देण्याची वेळ गोदडे कुटुंबीयांवर आली. या घटनेमुळे संपूर्ण जयप्रकाश नगरावर शोककळा पसरली होती. स्थानिक युवकांनी प्रसंगावधान राखत सकाळी लवकरच नियोजित वधू-वराचा विवाह सोपस्कार म्हणून पूर्ण केला. निधनाच्या घटनेचे दुःखद सावट टाळण्याचा प्रयत्न करत घरातील नवऱ्या मुलीला वाटे लावले. त्यानंतर काही वेळातच दुपारी मृत्युमुखी पडलेल्या विजय यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Web Title: vijay godade death in accident

टॅग्स