शिवाश्रमासाठी दान दिलेल्या जमिनीवर पायाभरणी समारंभ

शिवाश्रमाची पायाभरणी करताना सिनेकलाकार सचिन गवळी, स्मृती गवळी. शेजारी उपस्थित शाहीर विजय तनपुरे, मधुकर गिते आदी.
शिवाश्रमाची पायाभरणी करताना सिनेकलाकार सचिन गवळी, स्मृती गवळी. शेजारी उपस्थित शाहीर विजय तनपुरे, मधुकर गिते आदी.

सिन्नर (नाशिक): मेंढी (ता. सिन्नर) येथे उभारण्यात येत असलेल्या शिवाश्रमाचा पायाभरणी समारंभ शिवजयंतीच्या मुहूर्तावर अभिनेते सचिन गवळी, स्मृती गवळी यांच्या हस्ते झाला. प्रसिद्ध शिवशाहीर विजय तनपुरे यांच्या संकल्पनेतून हा शिवाश्रम मेंढी (ता. सिन्नर) येथे उभारला जात आहे. मेंढी येथील सहारा व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक मधुकर गिते यांनी या शिवाश्रमासाठी 50 गुंठे जमीन दान दिली असून, या जागेवर शिवाश्रमाची इमारत उभी राहणार आहे.

पायाभरणी समारंभाला शिवशाहीर विजय तनपुरे यांच्यासह उत्तम गाडे, शिवनाथ कापडी, सोमनाथ पागिरे, शिवचरित्रकार नवनाथ चव्हाण, शिवशाहीर स्वप्नील डुंबरे, प्रा. प्रकाश खुळे, सचिन ओझा, ऍड. भाग्यश्री ओझा, छावा क्रांतिवीर सेनेचे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष विलास पाटणी, प्रेरणा मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर बेलोटे, सोपान पाडवी, नीलेश तनपुरे आदी प्रमुख पाहुणे होते. या वेळी शिवाश्रमासाठी जमीन दान देणारे मधुकर गिते, शीला गिते, दीपक गिते, वनिता गिते यांचा सत्कार करण्यात आला. श्री. गिते यांनी सहारा व्यसनमुक्ती केंद्राविषयी माहिती दिली. या वेळी मान्यवरांची भाषणे झाली. बाळकृष्ण तनपुरे, गौरव तनपुरे, मंगेश खालकर, संदीप गिते, वैभव डोमाळे, वैष्णव नागरे, नीलेश तनपुरे आदी या वेळी उपस्थित होते.

समाजातील दिव्यांग घटकांच्या आर्थिक व सामाजिक उत्कर्षासाठी डॉ. तनपुरे यांनी शिवाश्रमाची संकल्पना मांडली आहे. दिव्यांगांना सन्मानाने जगता यावे यासाठी डॉ. तनपुरे यांची धडपड सुरू आहे. आपल्या शिवगर्जना व शिवायण या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळणारी रक्कम डॉ. तनपुरे महाराज बाजूला काढून ठेवतात. धर्मदाय आयुक्तांकडे देखील त्यांनी सार्वजनिक न्यास नोंदणी केली आहे. शिवाश्रम हा समाजातील प्रत्येक घटकाच्या मदतीतून उभा राहत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com