Vijaykumar Gavit: टंचाई, सिंचनासह रस्त्यांच्या कामांचे सूक्ष्म नियोजन करा : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित | Vijaykumar Gavit statament Plan meticulously for road works including irrigation and scarcity nandurbar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Speaking at the department review meeting, Guardian Minister Dr. Vijayakumar Village. Neighbor Collector Manisha Khatri

Vijaykumar Gavit: टंचाई, सिंचनासह रस्त्यांच्या कामांचे सूक्ष्म नियोजन करा : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

Vijaykumar Gavit : जिल्ह्यातील टंचाई, सिंचनासह रस्त्यांच्या कामांचे सूक्ष्म नियोजन करावे, तसेच जिल्हा नियोजनातून करावयाची शहरी क्षेत्रातील कामे तत्काळ सुरू करावीत, असे निर्देश आदिवासी विकासमंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिले आहेत. (Vijaykumar Gavit statament Plan meticulously for road works including irrigation and scarcity nandurbar)

जिल्ह्यातील टंचाई, जलसिंचन, सार्वजनिक बांधकाम, पालिका प्रशासन विभागांच्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते सोमवारी (ता. २२) बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री,

जिल्हा परिषदे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल (नंदुरबार), मंदार पत्की (तळोदा), सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता वैशाली पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी योगेश चौधरी, अक्कलकुवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पुलकित सिंह व विविध अंमलबजावणी यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले, की टंचाईग्रस्त गावांसाठी पाण्याच्या विहिरी व बोअरवेलसाठी भूजल सर्वेक्षण विभागाने सर्वेक्षण करून जागा निश्चित कराव्यात. तसेच विहीर खोलीकरणासाठी दोन ते तीन बोअरवेलसाठीचे व्हेरिफिकेशनही करावे.

त्यानंतर संबंधित विभागाने त्याचा आराखडा मान्यतेसाठी सादर करून आठ दिवसांत कामे सुरू करावीत. जिल्ह्यातील सरपंच, ग्रामसेवक यांची आढावा बैठक घेऊन जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गाव-पाड्यांवर उपाययोजना संबंधित पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी कराव्यात.

सर्व पालिकांनी जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून मंजुरी दिलेली कामे तत्काळ सुरू करावीत व त्याच्या प्रारंभप्रसंगी स्थानिक लोकप्रतिधींनाही निमंत्रित करावे. जिल्हा नियोजनाची कामे करताना शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचनांप्रमाणे करावीत.

ही कामे दोन वर्षांत करता येणार असली तरी मुदत संपलेल्या कामांचा निधी खर्च करता येणार नाही, असेही डॉ. गावित यांनी या वेळी सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सिंचन विभागाने जिल्ह्यातील मोठ्या नद्यांना पूर आल्यानंतर ज्या गावांमध्ये पाणी शिरते अशा पूरप्रवण गावांमध्ये संरक्षक भिंती बांधण्यासाठी, पूर आल्यानंतर प्रवाह बदलणाऱ्या नद्यांसाठी सर्वेक्षण करावे. ही सर्व कामे आपत्ती व्यवस्थापनांतर्गत करावयाची असल्याने त्यांचे प्रस्ताव तत्काळ सादर करावेत. जिल्ह्यातील ज्या यंत्रणांनी आपल्या कामांचे प्रस्ताव मंजुरीसाठी वरिष्ठ स्तरावर सादर केले आहेत, त्या यंत्रणांनी त्या प्रस्तावाची एक प्रत शासन पातळीवर पाठपुरावा करण्यासाठी उपलब्ध करून देण्याच्या सूचना या वेळी पालकमंत्री डॉ. गावित यांनी दिल्या.

या वेळी झालेल्या चर्चेत जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल (नंदुरबार), मंदार पत्की (तळोदा), सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता वैशाली पाटील,

जिल्हा नियोजन अधिकारी योगेश चौधरी, अक्कललकुवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पुलकित सिंह व विविध अंमलबजावणी यंत्रणांच्या प्रमुखांनी सहभाग घेतला.