PHOTOS : वाद्य कलावंतांचे गाव 'माळेगाव"..गावाचे असे रुप घालते मोहिनी!..

आनंद बोरा : सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

एकवीसशे लोकसंख्येच्या माळेगाव गावातील २० कलावंतांनी ५० वर्षांपासून ही परंपरा जोपासली आहे. जिल्हा परिषदेच्या पहिली ते आठवीच्या जुन्या शाळेचे रुपडे रंगकामाने पालटण्यात आले. वर्गखोल्यांना रेल्वेच्या डब्यांचे रूप देण्यात आले. रेल्वे डब्यांची प्रतिकृती पाहण्यासाठी अनेकांची पावले वळतात.

नाशिक : वाद्य कलावंतांचे गाव माळेगाव (ता. त्र्यंबकेश्‍वर). एकवीसशे लोकसंख्येच्या गावातील २० कलावंतांनी ५० वर्षांपासून ही परंपरा जोपासली आहे. जिल्हा परिषदेच्या पहिली ते आठवीच्या जुन्या शाळेचे रुपडे रंगकामाने पालटण्यात आले. वर्गखोल्यांना रेल्वेच्या डब्यांचे रूप देण्यात आले. रेल्वे डब्यांची प्रतिकृती पाहण्यासाठी अनेकांची पावले वळतात. तसेच शाळेच्या खांबावरील लावणी, मणिपुरी, भरतनाट्यम, भांगडा आणि ओडिसी नृत्य करणाऱ्या महिलांची सुंदर चित्रे आकर्षित करतात. 

Image may contain: 1 person

रेल्वे डब्यांचे वर्गखोल्यांना रूप.....! 

No photo description available.

गावात मारुती, मरीआई, पिरोबा ही मंदिरे आहेत. हनुमान जयंतीला गावात यात्रोत्सव होतो. भजनी मंडळ गावात असून, मंडळात गणपत कसबे, उत्तम कसबे, सावळीराम मुर्तडक, धोंडू मुर्तडक, संजू दिवे, लक्ष्मण दिवे आदी सहभागी होतात. गाव "पेसा'अंतर्गत येते. गावातील मल्ल मधुराम कवले, संपत कसबे, निवृत्ती दिवे, त्र्यंबक गोरे, पांडू दिवे, नामदेव फरके यांनी कुस्त्यांचे फड जिंकले. तसेच गावाजवळून वैशिष्ट्य नदी वाहते. गेल्या पंचवीस वर्षांपासून गावात हरिनाम सप्ताह होतो. 

Image may contain: 1 person, smiling, standing and outdoor

No photo description available.

जुन्या शाळेचे रुपडे रंगकामाने पालटलेले रुप

संतोष डोंगरावर पर्यटन शक्‍य 
अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने गावातील शेतीचे मोठे नुकसान झाले. गावात बॅंक नसल्याने आदिवासींना अडचणींना सामोरे जावे. गावाला ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार मिळाला. गावाच्या बाजूला संतोष डोंगर असून, डोंगरावर अनेक वनौषधी वनस्पती आहेत. वन विभागातर्फे पर्यटन विकासाची इथल्या आदिवासींची अपेक्षा आहे. जंगलात कोल्हे मोठ्या प्रमाणात आहेत. गावात विजेच्या उपलब्धतेची आणि उन्हाळ्यात भीषण टंचाईची अडचण असते. याशिवाय गावात दिंड्या मुक्कामी येतात. त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था गाव करते. 

Image may contain: 1 person, outdoor

प्लॅस्टिकमुक्त गाव करण्याचा संकल्प
गावाजवळील संतोष डोंगराचा पर्यटन क्षेत्र म्हणून विकास व्हावा. त्यातून गावाला रोजगार मिळणार आहे. गावात पाणी आणि विजेची अडचण असते. भुयारी गटार योजना गावात राबवायची असून, प्लॅस्टिकमुक्त गाव करण्याचा संकल्प आम्ही घेतला आहे. - तानाजी दिवे, सरपंच 

No photo description available.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Village of musical artists' Malegaon Trimbkeshwar Nashik