गोराणेत गावात पुढा-यांना गावबंदी 

दीपक खैरनार
गुरुवार, 24 मे 2018

अंबासन(नाशिक) - गोराणे (ता.बागलाण) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील आवारात ग्रामस्थांनी व हरणबारी उजवा कालवा संघर्ष समितीने गावात पुढा-यांना गावबंदी केली आहे. तसेच येत्या (ता.२९) रोजी होणा-या मतदानाचे वोटींग बुथही गावात लाऊ देणार नाही. असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. याबाबत ग्रामपंचायत, जायखेडा पोलिस ठाणे व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.

अंबासन(नाशिक) - गोराणे (ता.बागलाण) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील आवारात ग्रामस्थांनी व हरणबारी उजवा कालवा संघर्ष समितीने गावात पुढा-यांना गावबंदी केली आहे. तसेच येत्या (ता.२९) रोजी होणा-या मतदानाचे वोटींग बुथही गावात लाऊ देणार नाही. असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. याबाबत ग्रामपंचायत, जायखेडा पोलिस ठाणे व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.

हरणबारी उजव्या कालव्याचे काम पारनेरपासून सातमानेपर्यत गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. याबाबत तीस ते पस्तीस वर्षापासून तेरा गावांतील ग्रामस्थांकडून पाठपुरावा सुरू आहे. मात्र आधिकारी व पुढारी आश्वासने देऊन वेळ मारून नेत आहेत. मत मागण्याची वेळ आली की, हरणबारी उजव्या कालव्याचे काम करण्यासाठी माजी आमदार संजय चव्हाण यांनी गोराणेत एका कार्यक्रमात उजव्या कालव्याच्या कामासाठी मला पाठींबा द्या असे सांगितले होते. ग्रामस्थांनीसुध्दा त्यांना पाठिंबा दर्शविला होता. मात्र माजी आमदारांनी ग्रामस्थांची दिशाभूल करीत संबंधित विभागाकडून कुठल्याही प्रकारे आदेश नसतांना या भागात सर्वेक्षण करून घेतल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. 

माजी आमदार संजय चव्हाण यांनी विश्वासघात केल्याने गावात कोणत्याही पुढा-याला फिरकू देणार नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. गोराणेत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे फलक गावातील प्रवेशद्वाराजवळ लावण्यात आला असून, याबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे. गावातून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी एकही उमेदवार देण्यात आले नाहीत. हरणबारी धरणातून पुरपाणी उजव्या कालव्यासाठी आरक्षित करून पाणीटंचाईग्रस्त तेरा गावांची कायमस्वरूपी पाणीटंचाई दुर करण्यासाठी अनेक वर्षांपासून ग्रामस्थांनी मंत्री व आधिका-यांच्या भेटी घेतल्या. निवेदने दिली मात्र कामासाठी चालना मिळत नसल्याने संतप्त तेरा गावांतील ग्रामस्थांनी येणा-या प्रत्येक निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा ठराव केला आहे. 

दरम्यान गोराणेत काल बुधवारी (ता.२३) संपूर्ण गाव व परिसरातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन जिल्हा परिषदेच्या शाळेतील आवारात बैठक आयोजित केली होती. यात येणा-या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे वोटिंग बुथही लावले जाणार नसल्याचा निश्चय ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत शेकडो ग्रामस्थांनी सह्या करून जायखेडा पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश गावित, तहसीलदार जितेंद्र कुवर यांना निवेदन देण्यात आली आहेत. प्रशासनाने वोटींग मशीन लावण्याचा प्रयत्न केल्यास गावाकडून आक्रमक भुमिका घेतली जाईल असेही ग्रामस्थांनी सांगितले आहे.

Web Title: villagers agitation front of school