ग्रामस्थांच्या दारोदारी घंटागाडी व ‘आरओ’चे शुद्ध पाणी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 जून 2018

मालेगाव  : घंटागाडी दारोदारी जात असल्याने वसारी गावात स्वच्छतेचे चित्र दिसून येत आहे. ग्रामपंचायतच्या वतीने बसविण्यात आलेल्या ‘आरओ प्लॅन्ट’ मुळे ग्रामस्थांना शुद्ध व स्वच्छ पाणी मिळत आहे. पावसाळ्यापूर्वी स्वच्छतामय ग्राम वसारी करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.

मालेगाव  : घंटागाडी दारोदारी जात असल्याने वसारी गावात स्वच्छतेचे चित्र दिसून येत आहे. ग्रामपंचायतच्या वतीने बसविण्यात आलेल्या ‘आरओ प्लॅन्ट’ मुळे ग्रामस्थांना शुद्ध व स्वच्छ पाणी मिळत आहे. पावसाळ्यापूर्वी स्वच्छतामय ग्राम वसारी करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.

मालेगाव तालुक्‍यातील वसारी हे पाच हजारावर लोकसंख्येचे गाव आहे. राजकारणात कट्टर प्रतिस्पर्धी असताना समाजकारणात विधायक कामात मात्र कमालीचा एकोपा असतो. पाणी व्यवस्थापन केल्यामुळे जिल्ह्यात सर्वप्रथम ग्रामपंचायचा आरओ प्लॅन्ट वसारीत आला. तर कमालीची दुष्काळजन्य स्थिती असताना वसारीला पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्त्रोतात अजून वर्षभर पूरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. त्यापाठोपाठ पावसाळापूर्वी स्वच्छता नियोजनालाही वसारीवासीय भक्कम प्रतिसाद देत आहेत. महिना दीड महिन्यापासून घंटागाडी दारोदारी जाते.

ग्रामस्थ आपल्या आवारातील केरकचरा त्यामध्ये टाकतात. गावाच्या महत्वपूर्ण ठिकाणी तथा वर्दळ असणाऱ्या चौका-चौकात बसस्टॅंड परिसरात ठिकठिकाणी कचराकुंड्या लावल्याने लोक त्यामध्ये कचरा नेऊन टाकतात. कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्याकरिता ओला कचरा-सुकाकचरा यांचे अलगीकरण करून ग्रामपंचायत खड्डे खोदून त्यामध्ये कचरा टाकणार असल्याची माहिती संजय गांधी निराधार योजनेचे मालेगाव तालुकाध्यक्ष मारोतराव लादे यांनी दिली.

संत गाडगेबाबा स्वच्छतेचा मुलमंत्र व त्यामाध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या स्वप्नातील ‘आपलेच गाव तीर्थ’ बनविण्याचा समस्त वसारीवासीयांनी संकल्प केला आहे. या सत्रापासून शाळेतील मुलांनाही स्वच्छतेचे कार्यानुभव देण्यात येणार आहे.
- प्रा. दत्तात्रस कावरखे, ग्रामस्थ वसारी

  • खासदार धोत्रे यांची भेट

पाणी व्यवस्थापन, स्वच्छता नियोजन करणाऱ्या वसारी गावाला गत आठवड्यात खासदार संजय धोत्रे यांनी भेट दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नातील भारत गावगाड्यात आढळत असल्याचे मत खासदार धोत्रे यांनी व्यक्त केले होते.

Web Title: The villagers will get garbage carrier service at door and 'RO' pure water