डेहराडून येथील प्रशिक्षणात डॉ विनायक काळे यांचे यश

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

लखमापूर(नाशिक) - 27 भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रो तर्फे डेहरादून येथे आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात लखमापुर (ता. दिंडोरी, जिल्हा. नाशिक ) गावचे भूमिपुत्र प्रा डॉ विनायक काळे यांनी अ श्रेणी उच्चस्तरीय नामांकन प्राप्त करून यश संपादन केले. डॉ काळे सध्या मविप्र संस्थेच्या पिंपळगांव ब येथील महाविद्दयाल्यात     प्राध्यापक आहेत उत्तराखंड राज्यातील डेहरादून येथे आयोजित आय आय आर एस या 54 दिवसीय प्रशिक्षणात त्यांनी उपग्रह प्रक्षेपण, प्रतिमा वाचन, नद्यांच्या खोऱ्यातील मृदेची झीज, सॉफ्टवेयर वापर या विषयावर अभ्यास व संशोधन प्रकल्प सादर केले. 

कार्यक्रमात देशातून 48 अभ्यासक सहभागी झाले होते. याबद्दल त्यांचे मविप्रच्या सरचिटणीस श्रीमती निलिमाताई पवार, कादवा कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे, मविप्र संचालक दत्तात्रेय पाटील, शिक्षणाधिकारीडॉ डी डी  काजळे प्राचार्या डॉ एस एस घुमरे, प्राचार्य डॉ डी बी शिंदे,प्रा सिताराम निकम , प्रा हेमंत पाटील, प्रा नारायण पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

डॉ विनायक काळे यांनी उत्तराखंड राज्यातील डेहरादून येथे इस्रो प्रशिक्षण प्रसंगी अ श्रेणी प्रमाणपत्र देताना इस्रो चे संचालक डॉ प्रकाश चव्हाण, व्यासपीठावर  आयोजक ए के मिश्रा, डॉ सुरेशकुमार आदि मान्यवर

Web Title: Vinayak Kale's success in Dehradun training