विंचूर - प्रकाशा राज्य महामार्ग मृत्युचा सापळा

अंबादास देवरे
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

सटाणा : शहरातून जाणाऱ्या विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गाच्या दुतर्फा दिवसेंदिवस वाढत असलेले अतिक्रमण, अवजड व बेशिस्त वाहतूकीस वळण लावण्यास पालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिस प्रशासन हतबल झाल्याने हा महामार्ग मृत्युचा सापळा बनला आहे. निव्वळ बैठका घेऊन कार्यवाहीचा फार्स करण्यापेक्षा ही वाहतूक वारंवार ठप्प का होते, याची कारणे सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिस यंत्रणेने शोधावीत आणि त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे काळाची गरज आहे. 

गेल्या जुलै महिन्यात पालिका सभागृहात नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पोलिस, सार्वजनिक बांधकाम विभाग, बँका व पालिकेच्या अधिकार्‍यांसह लोकप्रतीनिधी व पत्रकारांच्या दोन बैठका झाल्या. या बैठकीत महामार्गावरील अतिक्रमण काढणे, बँका, पतसंस्था, एटीएम समोर बँक प्रशासनाने पार्किंगची व्यवस्था करावी, टिळकरोडवरील हातविक्रेत्याना रस्त्याच्या मध्यापासून आवश्यक ते अंतर निश्चित करून द्यावे.

महामार्गावर काही अनावश्यक ठिकाणी असलेले गतिरोधक काढावेत, चार फाट्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जागा बदलावी, दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पार्किंग झोन निश्चित करावे, स्कूलबसेस चे थांबे निश्चित करावे, दैनंदिन भाजीपाला बाजारात भाजी विक्रेत्यांनी पालिकेने नेमून दिलेल्या जागेवरच भाजीपाला विक्री करावी असे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले होते. आता या बैठकांना चार महिन्यांचा कालावधी लोटला. मात्र प्रत्यक्ष कार्यवाही शून्य असल्याने या बैठका निव्वळ फार्स ठरल्या आहेत.

Web Title: Vinchur - light state highway death trap