कोट्यवधींना गंडविणाऱ्या विनोद पाटीलला अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मार्च 2017

नाशिक - हाउस ऑफ इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांना गंडा घालणारा मुख्य सूत्रधार विनोद पाटील याला गुन्हे शाखेने मुंबईतील खेरवाडीतून अटक केली. संशयित पाटील मुंबईतील टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीकडे बनावट नाव वापरून ड्रायव्हर कम गाइड म्हणून काम करीत असल्याचे पोलिस तपासात समोर आले. न्यायालयात हजर केले असता, त्यास येत्या 22 तारखेपर्यंत सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

गंगापूर रोडवर हाउस ऑफ इन्व्हेस्टमेंट कंपनी स्थापून मुख्य सूत्रधार विनोद पाटील याने सुमारे 15 संचालकांमार्फत 24 टक्के व्याजाचे आमिष दाखवून 50 हजारांपासून ते एक कोटी रुपयांपर्यंतच्या ठेवी गुंतवणूकदारांकडून गोळा केल्या होत्या. गुंतवणूकदारांची जवळपास 300 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले. गेल्या 20 ऑगस्टला गंगापूर पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने 14 संचालकांना अटक केली; परंतु सूत्रधार विनोद पाटील फरारी होता. पोलिसांनी विनोदच्या पत्नीलाही अटक केली असून, सध्या मध्यवर्ती कारागृहात आहे.

Web Title: vinod patil arrested by cheating