परमोरी घटनेच्या पार्श्वभूमीवर आ.झिरवाळ यांची वन मंत्र्याची भेट

संदीप मोगल
गुरुवार, 6 सप्टेंबर 2018

लखमापूर (मालेगाव) - सोमवार दि.३ सप्टेंबर रोजी परमोरी (लखमापूर) येथे बिबट्याने कु.सार्थक ज्ञानेश्वर दिघे या ३ वर्षाच्या कुटुंबातील एकुलत्या एक मुलाला ठार केले. या घटनेमुळे संपूर्ण पंचक्रोशीतील शेतकरी, मजूर भयभीत झालेले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार नरहरी झिरवाळ यांनी दिंडोरी तालुक्यातील शेतकरी शिष्टमंडळाला बरोबर घेऊन, वने व वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची सह्याद्री अतिथी गृह, मुंबई येथे भेट घेतली. 

यावेळी आमदार झिरवाळ यांनी दिघे कुटुंबीयांना जास्तीत जास्त आर्थिक मदत करावी, लवकरात लवकर तालुक्यातील बिबट्यांना पकडण्याचे आदेश द्यावेत, ग्रामीण भागात दिवसा लाईट देण्याचे आदेश द्यावेत, शेतावर व गावांमध्ये सोलर लाईट देण्याचे व्यवस्था करावी, गावाला कुंपण करण्यात यावे इ. प्रभावी मागण्या केल्यात. 

त्यावर मंत्र्यांनी आमदार झिरवाळ आणि शेतकाऱ्यांबरोबर सखोल चर्चा करून वन विभागाच्या सचिव यांना वरील योजना अमलात आणण्याकरिता तातडीने बैठक घेण्याचे आणि त्यावर निर्णय घेण्याचे आदेश दिलेत. लवकरात लवकर सर्व मागण्या पूर्ण करण्याचे शिष्टमंडळस आश्वासन दिलेत. 

याप्रसंगी सोमनाथ कारभारी दिघे, दगु दिघे, महेश शिवले, अनिल दिघे, राकेश दिघे व तालुक्यातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: visit to Forest Minister on the backdrop of Paramori incident