राहुलच्या संघर्षाची विठ्ठल कामतांकडून दखल

राहुलच्या संघर्षाची विठ्ठल कामतांकडून दखल

नाशिक - इमारतीवरून २७ वर्षांपूर्वी पडल्याने दिव्यांग झालेल्या राहुल विंचूरकर याने प्रचंड मेहनतीतून ज्ञानदानाचा वटवृक्ष फुलविला. त्याची ही यशोगाथा सोमवारी (ता. १४) ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाली. त्याच्या संघर्षाची दखल उद्योजक विठ्ठल कामत यांनी घेतली. 
संबंधित वृत्त - 
जिद्दीने केली संवेदनाहीन शरीरावर मात

‘सकाळ’मधील वृत्त वाचून श्री. कामत यांनी राहुलशी संवाद साधला. राहुलने रतन टाटा आपले आदर्श असल्याचे म्हटले होते. त्यानुसार श्री. कामत यांनी संवाद घडवून आणून देण्याचा शब्द दिला. तसेच ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे आणि बीव्हीजी ग्रुपचे प्रमुख हनुमंत गायकवाड यांनीही राहुलला शुभेच्छा दिल्या.

इंदिरानगरमधील राहुल याच्याशी संपर्क साधत डॉ. भरत केळकर, विश्‍वास ठाकूर, डॉ. शैलेंद्र गायकवाड यांच्यासह अनेकांनी त्याचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. राहुलचे तीन मणके व मज्जारज्जू तुटल्यामुळे छातीपासूनचा खालचा भाग संवेदनाहीन झाला आहे. त्यामुळे त्याला झोपूनच काम करावे लागते. अशाही परिस्थितीत त्याने हार न मानता दहावी शिकलेला राहुल अध्यापन करीत आहे. इंग्रजी संवादाचे शिक्षण देत त्याने उद्योजक होण्याचे स्वप्न डोळ्यांत साठविले आहे. त्याला मूर्त रूप देण्यासाठी त्याची  धडपड सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com