#votetrendlive बालेकिल्ला राखण्यात 'इंजिन' फेल!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

खासदार हेमंत गोडसे आणि खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांच्या पुत्रांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. विजयी उमेदवार आज शहरात ठिकठिकाणी विजयोत्सव साजरा करत असल्याचे चित्र दिसत आहे.

नाशिक - ज्या महानगरपालिकेत वर्चस्व गाजवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपली प्रतिष्ठा कायम ठेवली होती, तेथे पक्षाला जबदरस्त धक्का बसला असून कमळाला फुलविण्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना यश मिळाले आले. 

आतापर्यंत हाती आलेल्या निकालानानुसार भारतीय जनता पक्षाला 21, शिवसेनेला 12, काँग्रेसआणि राष्ट्रवादीला 2, तर मनसेला केवळ एका जागेवर यश मिळाले आहे. अनेक ठिकाणी मतदारांनी पॅनलला प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. प्रभाग क्रमांक 1, 4, 20 मध्ये भारतीय जनता पक्षाचे चारही उमेदवार निवडून आले आहेत. तर प्रभाग क्रमांक आठमधील चारही उमेदवार निवडून आणण्यात शिवसेनेला यश मिळाले आहे. प्रभाग क्रमांक 13 मधील दोन जागांवर कॉंग्रेसला यश मिळाले आहे. तर याच प्रभागातील एका जागेवर मनसेला विजय मिळाला आहे. 

खासदार हेमंत गोडसे आणि खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांच्या पुत्रांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. विजयी उमेदवार आज शहरात ठिकठिकाणी विजयोत्सव साजरा करत असल्याचे चित्र दिसत आहे. तर मतमोजणी केंद्रांवर कल विरुद्ध बाजूने गेल्याने अनेक उमेदवारांनी केंद्र सोडून निघून गेल्याचेही आढळून आले आहे. माजी महापौर यतीन वाघ यांच्यासह राष्ट्रवादीच्या विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक, नगरसेवक उत्तम दोंदे, माधुरी जाधव यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले आहे. 

आतापर्यंत विजयी (अलिकडचा आकडा प्रभाग क्रमांक) 
भाजप 

20 आंबदास पगारे 
20 सीमा ताजणे 
20 संगीता गायकवाड 
20 संभाजी मोरूस्कर 
7 हिमगौरी अडके 
7 योगेश हिरे 
7 स्वाती भामरे 
17 दिनकर आढाव 
17 अनीता सातभाई 
4 हेमंत शेट्टी 
4 शांताबाई हिरे 
4 सरिता सोनवणे 
4 जगदीश पाटील 
1 रंजना भानसी 
1 अरूण पवार 
1 गणेश गीते 
1 पूनम धनगर 
27 राकेश दोदे 
27 किरण गामने 

शिवसेना 
7 अजय बोरस्ते 
17 प्रशांत दिवे 
17 मंगला आढाव 
25 सुधाकर बडगुजर 
25 हर्षा बडगुजर 
25 श्‍यामकुमार साबळे 
8 नयना गांगुर्डे 
8 राधा बेंडकुळे 
8 संतोष गायकवाड 
8 विलास शिंदे 
27 किरण गामने 
27 चंद्रकांत खाडे 

राष्ट्रवादी 
13 गजानन शेलार 
17 सुषमा पगारे 

काँग्रेस
13 वत्सला खैरे 
13 शाहू खैरे 
16 राहुल दिवे 

मनसे 
13 सुरेखा भोसले 
 

Web Title: #votetrendlive nashik municipal corporation mns defeated