नाशिकमध्ये जुना वाडा कोसळला; जिवीतहानी नाही (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जुलै 2019

या व्यतिरिक्त नाशिकमध्ये अन्य चार वाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. भोईगल्ली येथील कांबळेवाडा रविवारी दुपारी कोसळण्याची घटना घडली. संसार उपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी टळली. दरम्यान, मेनरोडवरील दोन आणि अशोकस्तंभावरील एक असे चार वाडे एकाच दिवसात कोसळले.

नाशिक : जुन्या नाशिक परिसरातील एक जुना वाडा रविवारी कोसळला. वाडा कोसळण्यापूर्वीच लोकांना बाहेर काढण्यात आल्याने जिवीतहानी टळली. वाड्याचा एक भाग कोसळल्यामुळे उर्वरित वाडा पाडण्यात आला आहे. संततधार पावसामुळे वाडा कोसळल्याचा अंदाज अग्निशामक दलातर्फे वर्तविण्यात आला आहे.

या व्यतिरिक्त नाशिकमध्ये अन्य चार वाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. भोईगल्ली येथील कांबळेवाडा रविवारी दुपारी कोसळण्याची घटना घडली. संसार उपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी टळली. दरम्यान, मेनरोडवरील दोन आणि अशोकस्तंभावरील एक असे चार वाडे एकाच दिवसात कोसळले. शनिवार आणि रविवार दोन्ही दिवस शहरात पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे विविध भागात वाडे आणि वृक्ष कोसळण्याच्या घटना घडल्या.

मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे गोदावरीसह दारणा, वालदेवी, वाघाडी, नासर्डी आणि सिन्नर तालुक्‍यातील म्हाळुंगी व सुरगाणा तालुक्‍यातील नार, दमणगंगा नद्या खळाळून वाहू लागल्या आहेत. आदिवासी पट्ट्यात 18 तासांपासून पाऊस जोरदार हजेरी लावत असून, हवामान विभागाच्या अतिवृष्टीच्या शक्‍यतेने गोदाकाठी अतिदक्षतेचा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे. गोदाकाठच्या काझीगढीवरील 35 कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे. त्र्यंबकेश्‍वर शहरामध्ये पाणी शिरल्याने पूरस्थिती तयार झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wada collapse due to rain in Nashik