वाडिया रुग्णालयातील  प्रसूती कक्षाची दुरवस्था

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

मालेगाव - महापालिकेच्या वाडिया रुग्णालयातील प्रसूती व शस्त्रक्रिया कक्षाची दुरवस्था झाली आहे. आंतररुग्ण दाखल करण्यासाठी असलेल्या खोल्यांमध्ये साहित्य भरले आहे. यामुळे शस्त्रक्रिया व प्रसूती झालेल्या महिला रुग्णांना कक्षाबाहेर थांबावे लागते. 

रुग्णालयात शौचालयाची सुविधा नाही. आरोग्य विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी प्रशासनाचा निषेध व्यक्त करीत आयुक्तांकडे गाऱ्हाणे केले. पाहणीनंतर आयुक्तांनी या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले.

वाडिया रुग्णालयात दररोज तीन-चार महिलांची प्रसूती होत असते. प्रसूती कक्षाचीच स्थिती बिकट आहे. रुग्णालय व रुग्णांच्या सोयीसाठी घेतलेले जनित्र वर्षानंतरही कार्यरत झालेले नाही. याबाबत महिलांनी नगरसेवक जाविद शेख यांच्याकडे तक्रार दाखल केली. माहिती मिळताच आमदार आसिफ शेख, माजी महापौर मलिक युनूस ईसा, नगरसेवक अस्लम अन्सारी आदी कार्यकर्त्यांसह रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी रुग्णालय व परिसराची पाहणी केली. येथील दुरवस्थेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करतानाच दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. संबंधितांच्या शिष्टमंडळाने आयुक्त रवींद्र जगताप यांची भेट घेत त्यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले. त्या वेळी रुग्णालयात जनित्र येऊन वर्ष झाले. मात्र त्याची साधी जोडणी झाली नसल्याचे निदर्शनास आले. हे जनित्र ताब्यात घेतलेले नाही की जोडणी झालेली नाही याबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करू. आरोग्याधिकाऱ्यांसह संबंधितांना तातडीने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचे आयुक्त जगताप यांनी सांगितले. दरम्यान, रुग्णालयात सोयीअभावी महिला रुग्ण वऱ्हांड्यात उपचार घेत आहेत. रुग्णालय आवारात शौचालयाची सोय नसल्याने महिलांच्या अडचणीत भर पडली आहे. हे प्रश्‍न तातडीने मार्गी लावण्याची मागणी होत आहे.

Web Title: Wadia hospital maternity leave