PHOTO : पाणीटंचाईचे शहर म्हणून ओळख..पण यंदा धरण ओव्हरफ्लो

अमोल खरे : सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

दिवाळीच्या सुट्टीची पर्वणी साधत मामाच्या गावाला आलेले बच्चेकंपनी, मनमाडकर सध्या वाघदर्डी धरणावर गर्दी करत असून, ओसंडून वाहणाऱ्या धरणाच्या सांडव्यावर पोहण्याचा मनसोक्त आनंद लुटत आहे. वाघदर्डी धरणाचा पानपसारा आणि सौंदर्य मनमोहक असल्याने अनेक जण आपल्या कुटुंबासह हजेरी लावत आहे.

नाशिक :  राज्यातील पाणीटंचाईचे शहर म्हणून मनमाड शहराकडे पाहिले जाते. या शहराला पाणीपुरवठा करणारे वाघदर्डी धरण यंदा प्रथमच चार वर्षांनी पूर्ण क्षमतेने भरले आहे. साधारण महिन्यापासून धरणाच्या सांडव्यातून पाणी ओसंडून वाहत आहे वाघदर्डी धरण भरल्यामुळे मनमाड शहराचा  पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटल्याने शहरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तर धरण पाणलोटक्षेत्रात परतीचा चांगला पाऊस झाल्यामुळे पुन्हा वाघदर्डी धरणातुन पाणी ओसंडून वाहत असल्याने दिवाळीच्या सुट्टीची पर्वणी साधत मामाच्या गावी आलेली बच्चेकंपनी आणि अक्टोंबर हिट ने बेजार झालेले मनमाडकर,  पर्यटक धरणावर मोठी गर्दी करीत आहे.  धरणाचे विलोभनीय चित्र आणि पानपसारा डोळ्यात साठवितांना पर्यटकांच्या चेहऱ्यावर एक वेगळे समाधान  दिसत आहे. 

Image may contain: 2 people, people smiling

मामाच्या गावाला आलेली बच्चेकंपनी, मनमाडकरांची वाघदर्डी धरणावर गर्दी
सांडव्यातून वाहणाऱ्या पाण्याचे उडणाऱ्या तुषाराने मनमाडकर, बच्चेकंपनी ओलेचिंब होत आहे. तर सांडव्यातुन पडणाऱ्या पाण्याखाली अनेक जण मनसोक्त अंघोळीचा आणि पोहण्याचा आंनद लुटत आहे यामुळे अनेकांना दिवाळीची सुट्टी सेलिब्रेट करण्यासाठी धरण पर्यटन पॉईंट झाला आहे

No photo description available.

धरणावर रंगतेय कुटुंबपार्टी

मनमाड शहरासह परिसरातील नागरिक धरणावर आवर्जुन हजेरी लावत मोठी गर्दी करतांना दिसतात. तर पोहण्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी अनेक जण कुटुंबासह येत असून याच ठिकाणी कुटुंबपार्टी केली जात आहे. मनमाड शहरात अंकाई किल्ला, गोरखनाथ डोंगर, अंगठ्याचा डोंगर, मेसण्या डोंगर, गुरुद्वारा ही पर्यटनाची स्थळे सोडली तर दुसरी महत्त्वाची ठिकाणे नाही त्यामुळे ओसंडून वाहणारे वाघदर्डी धरण मनमाडकरांना पर्यटन स्थळ झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the Waghdardi Dam, which supplies water to the city, has been filled to full capacity.