Dhule News : उड्डाणपुलाखालील भिंती वेधताहेत लक्ष; थोर व्यक्तींची रेखाटली हुबेहुब छायाचित्रे

Photograph of Sir Visvesvaraiah sketched under the flyover near Nagaonbari Chauphuli
Photograph of Sir Visvesvaraiah sketched under the flyover near Nagaonbari Chauphuli esakal

धुळे : उत्तरेकडून धुळे शहरात प्रवेश करताना आता उड्डाणपुलाखालील भिंती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. या भिंतींवर प्रसिद्ध आणि शहराशी ऋणानुबंध असलेल्या व्यक्तींची हुबेहुब छायाचित्रे रेखाटण्यात आली आहेत. (walls under flyover are painted with detailed portraits of dignitaries associated with dhule news)

कलावंतांनी त्यांच्यातील कसब पणाला लावत ही चित्रे रेखाटली आहेत. चित्रांकडे पाहिल्यानंतर संबंधित व्यक्ती आपल्याशी संवाद साधू पाहात आहे, अशी क्षणभर जाणीव होते. या चित्रांमुळे नगावबारी परिसराच्या सौंदर्यात भर पडली आहे. श

जिल्ह्याशी ऋणानुबंध असलेल्यांपैकी लता मंगेशकर आणि सर विश्वेश्वरैया यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांचे आजोळ शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील आहे.

थाळनेर येथे लता मंगेशकर यांचे बालपण काही काळ गेले आहे. त्यांची सर्वांना आठवण राहावी आणि त्यांच्या व्यक्तिमत्वातून प्रेरणा घेतली जावी या उद्देशाने नगावबारीजवळील उड्डाणपुलाच्या भिंतीवर लता मंगेशकर यांचे हुबेहुब चित्र रेखाटण्यात आले आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Photograph of Sir Visvesvaraiah sketched under the flyover near Nagaonbari Chauphuli
Nashik ZP News : जिल्हा परिषद 2 पर्यंत जागी! अखेर मिळविले 53 कोटी

भारतरत्न पुरस्काराने सन्मानित सर विश्वेश्वरैय्या यांनी काही काळ धुळे शहरात काम केले आहे. जिल्ह्यात सिंचनासंबंधी फड पद्धत, सायफन पद्धतीची रचना व विकास सर विश्वैश्वरैय्या केला असून त्यांची आठवण राहावी यासाठी त्यांचे हुबेहुब चित्र रेखाटण्यात आले आहे. चंदेरी दुनियेत ठसा उमटविणाऱ्या अभिनेत्री स्मिता पाटील या शिरपूर येथील होत्या.

आपल्या अभिनयामुळे आजही स्मिता पाटील प्रेक्षकांच्या दृष्टीपटलासमोर असतात. नवीन पिढीला त्याची माहिती व्हावी यासाठी भिंतीवर स्मिता पाटील यांचे हुबेहुब चित्र रेखाटण्यात आले आहे. प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वाची या जिल्ह्याशी ऋणानुबंध ठेवले आहेत. त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी आणि पुढच्या पिढीला त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची माहिती व्हावी यासाठी ही चित्रे रेखाटण्यात आली आहेत.

Photograph of Sir Visvesvaraiah sketched under the flyover near Nagaonbari Chauphuli
Nashik News : यंदा 100 टक्के निधी झाला खर्च; सर्वसाधारण आणि आदिवासी उपयोजनेला यश!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com