अतिक्रमण काढण्यासाठी प्रभागनिहाय पथक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

जळगाव - शहरातील अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिकेतर्फे व्यापक स्तरावर मोहीम हाती घेण्यात येणार आहे, यासाठी प्रभागनिहाय पथक तयार करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त जीवन सोनवणे यांनी दिली. दरम्यान, आज महापालिकेतील अतिक्रमित फलक हटविण्यात आले. 

जळगाव - शहरातील अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिकेतर्फे व्यापक स्तरावर मोहीम हाती घेण्यात येणार आहे, यासाठी प्रभागनिहाय पथक तयार करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त जीवन सोनवणे यांनी दिली. दरम्यान, आज महापालिकेतील अतिक्रमित फलक हटविण्यात आले. 

महापालिकेच्या गोलाणी संकुलात फलकांचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होते. अतिक्रमण निर्मूलन विभागाने ते हटविण्याची कारवाई आज केली आहे. गोलाणी संकुलात आयुक्त जीवन सोनवणे यांनी अचानक भेट दिली होती. त्यावेळी याठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण दिसून आले, संकुलात प्रत्येक दुकानाच्या बाहेर मोठमोठे फलक लावण्यात आले होते. त्यामुळे ग्राहकांना अडथळा निर्माण होत होता. आयुक्तांनी हे अतिक्रमण काढण्याचे आदेश आज अतिक्रमण निर्मूलन विभागाला दिले, त्यानुसार आज दुपारी अतिक्रमण विभागाने कारवाई सुरू केली. यापुढे अशा प्रकारेच फलक लावल्यास संबधित दुकानारावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. 
 

प्रभागनिहाय पथक
शहरातील अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिकेतर्फे आता प्रभागनिहाय पथक तयार येणार आहे. सद्यःस्थितीत शहरात अतिक्रमण विभागाचे एकमेव पथक आहे. त्यामुळे त्यांना एका ठिकाणाहून दुसरीकडे कारवाई करण्यास जाता येत नाही. त्यामुळे आता त्या-त्या प्रभाग अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली पथक असेल. यासाठी काही विभागांतून काढून अतिक्रमण विभागात कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

Web Title: Ward wise to remove the encroachment squad