गड-किल्ल्यांवर मद्यपी दिसला..तर त्याची "धुलाई' करा रे!

सकाळ वृत्तसेवा 
Wednesday, 25 December 2019

किल्ल्यांवर मद्यपान करणाऱ्या तरुणांची गय केली जाणार नाही. चोप देण्यात येईल, येत्या 31 डिसेंबर आणि त्यापूर्वीच्या काळात मद्यधुंद व मांसाहारी पार्ट्या करणाऱ्या प्रवृत्तीचा बंदोबस्त करून शिवकालीन गड-किल्ल्यांचे संरक्षण करावे. कोणी विटंबना केल्याचे आढळल्यास सापडलेल्या व्यसनाधीन व्यक्तींना चोप देण्यात येईल, असे त्यांनी पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंग यांना मनसेकडून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. 

नाशिक : गड-किल्ल्यांवर 31 डिसेंबरला मद्यपान करणाऱ्यांवर शासनातर्फे कडक कारवाई करावी. कळसूबाई शिखर, कावनई किल्ला, त्रिंगलवाडी किल्ला, कुलंग, मदन, अलंगगड, विश्रामगड आदी किल्ल्यांवर मद्यपान करणाऱ्या तरुणांची गय केली जाणार नाही. चोप देण्यात येईल, असा इशारा (इगतपुरी) मनसेचे जिल्हा संघटक भगीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखाली मनसे पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (ता. 23) दिला. 

पोलिस अधीक्षकांचेही कठोर कारवाईचे आश्‍वासन 

येत्या 31 डिसेंबर आणि त्यापूर्वीच्या काळात मद्यधुंद व मांसाहारी पार्ट्या करणाऱ्या प्रवृत्तीचा बंदोबस्त करून शिवकालीन गड-किल्ल्यांचे संरक्षण करावे. कोणी विटंबना केल्याचे आढळल्यास सापडलेल्या व्यसनाधीन व्यक्तींना चोप देण्यात येईल, असे त्यांनी पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंग यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. 

Image may contain: one or more people, people standing and outdoor

नाशिक : पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंग यांच्या कार्यालयात गड-किल्ल्यांच्या सुरक्षिततेसाठी निवेदन देताना भगीरथ मराडे, बाळासाहेब भगत, आत्माराम मते, हरिश्‍चंद्र चव्हाण. 

गड-किल्ल्यांवर ट्रेकिंगवीर विशेष लक्ष देणार

सरत्या वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजे, 31 डिसेंबरला विशेषतः तरुण एखाद्या निवांत ठिकाणी मद्यपानास पसंती देतात. मात्र, या वर्षी नाशिक जिल्ह्यासह इगतपुरी तालुक्‍यातील कळसूबाई शिखर, कावनई किल्ला, त्रिंगलवाडी किल्ला, कुलंग, मदन, अलंगगड, विश्रामगड आदी किल्ल्यांवर मद्यपान करणाऱ्या तरुणांची गय केली जाणार नाही, अशी माहिती मराडे यांनी दिली. सर्वाधिक वर्दळ असलेल्या कळसूबाई शिखर व कावनई किल्ल्यासह भावली परिसरातील गड-किल्ल्यांवर ट्रेकिंगवीर विशेष लक्ष देणार असून, बाकी सर्व ठिकाणी पोलिसांची मदत घेणार आहेत. 

हेही वाचा > कॉंग्रेस जिल्हा परिषद सदस्यांच्या एकीचा निर्धार 

जिल्हाभरातील पोलिस ठाण्यांना याबाबत सूचना

दरम्यान, कावनई, त्रिंगलवाडी, अलंग-मलंग, मदन, हरिहर, भास्करगड, मोरधन, गडगडसागवी, विश्रामगड, तसेच जिल्ह्याच्या इतर किल्ल्यावर मद्यपान करतात. मद्यपान करून बाटल्या गडावर टाकून कचरा करतात. अनेकदा आगदेखील लावली जाते. जिल्हाभरातील पोलिस ठाण्यांना याबाबत सूचना देऊन गड-किल्ल्यांवर अस्वच्छता करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आश्‍वासन पोलिस अधीक्षकांनी दिले. या वेळी माणिकखांबचे माजी सरपंच हरिश्‍चंद्र चव्हाण, जिल्हा सचिव अभिजित कुलकर्णी, विद्यार्थी उपजिल्हाप्रमुख आत्माराम मते, अशोक हेमके, बाळा आरोटे, प्रवीण भटाटे, गोकुळ चव्हाण, रामदास चव्हाण, किरण बोंबले उपस्थित होते. 

हेही वाचा > धरणावर फिरायला आलेले पर्यटक गाडीपाशी गेले..अन् गाडीत पाहिल्यावर धक्काच...कारण..

हेही वाचा > शिक्षकाच्या खोलीतून वाफा बाहेर येत होत्या... त्यांनी खिडकीचा कप्पा उघडून पाहिला तर धक्काच!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: warning from Maharashtra navnirman sena if alcoholic seen on fort Nashik Marathi News