सप्तशृंगी गडाच्या जगंलात पशु-पक्षांसाठी दाणा-पाण्याची व्यवस्था

nashik
nashik

वणी (नाशिक) : मार्च महिना संपण्या अगोदरच जिल्ह्यात तापमान ४० अंशांपर्यंत पोहोचले असून उन्हाच्या तीव्रतेमुळे पाणीसाठा आटत चालला असून जंगलात पशु-पक्षी व वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटंकती वाढल्याने नांदुरी (कळवण) येथील मार्निंग गृपच्यावतीने सप्तशृंगी गड घाट रस्त्याच्या जंगलात पाणी व अन्नाची व्यवस्था करीत भूतदयेचे दर्शन घडविले आहे.

सप्तशृंगी गडाच्या पायथ्यालगत असलेला सप्तशृंगी घाट रस्ता, मार्कंड पिंप्री, अहिवंतवाडी, चंडीकापूर, भातोडे, मार्कंडेय बारी या सर्व बाजूने कमी जास्त प्रमाणात जंगल असून या जंगलात बिबट्या बरोबरच मोर, लांडगे, अजगर, माकडे, रानमांजर, रानडुक्कर, ऊद मांजर, कोल्हे, तितर व तसेच फेसर, लावरी, तितुर, व्हलगी कावळा, चिमणी, साळुंकी, फुलचुखी, रानघुबड, बगळे आदी आदी प्रकारच्या पक्ष्याचा वावर आहे.  

मात्र उन्हाळ्यात जंगलातील वनबंधारे कोरडे होत असल्याने जगंलातील वन्यप्राणी व पशु पक्षांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. ही बाब लक्षात घेवून नांदुरी येथील नांदुरी येथील मॉर्निंग ग्रुपच्या वतीने जंगलातील पशुपक्ष्यांसाठी पाणी व धान्याची व्यवस्था केली आहे. ग्रुपचे सदस्य पोलीस कॉन्स्टेबल योगेश गवळी यांच्या प्रयत्नातून पशु पक्षांना पाण्यासाठी कुंड्या आणल्या आहेत. त्या मार्निग गृपच्या वतीने सप्तशृंगी घाट रस्ता लगतच्या जगंलात ठिकठिकाणी कुंड्या ठेवून पाणी व खाद्यासाठी धान्य ठेवण्यात आली आहे. 

या कुंड्यामध्ये गृपचे सदस्य योगेश गवळी, माजी सरपंच सुभाष राऊत, किरण अहिरे, गणेश आहिरे, कांतीलाल राऊत, गणेश कदम, ताराचंद्र चौधरी, पवन साबळे, भूषण देशमुख, प्रवीण चित्ते हे दररोज पाणी व धान्याची व्यवस्था करीत आहे. दरम्यान गृपच्यावतीने सप्तशृंगी घाटाच्या युटन पासून तर स्वागत कमानी पर्यंत गडावर येणाऱे भाविक व पर्यटकांना आकर्षीत व प्रवास आनंददायी करण्यासाठी विविध प्रकारचे फुल झाडे, फळ झाडे लावण्यात येणार आहे. त्यासाठी युटन जवळ पाण्याची टाकी बांधण्यात येणार असून ड्रीपच्या साह्यने झाडांना पाणीपूरवठा व झाडांची संगोपन करणार आहे.यासाठी वृक्षप्रेमी व सामाजिक संस्थाची मदत घेण्यात येणार असल्याची माहिती गृपच्या सदस्यांनी दिली. 

गेल्या अनेक दिवसापासून हा उपक्रम राबविण्याची तयारी सुरू होती. यासाठी गावातील तरुणांनी सहकार्य व मदत मिळत असल्याने उपक्रम नक्कीच यशस्वी होईल. सप्तशृंग गडावर येणाऱ्या भाविकांसाठी निश्चितच एक वेगळे आकर्षण म्हणून वृक्ष लागवड ही करण्याचे नियोजन सुरु आहे.
- योगेश गवळी, पोलीस कॉन्स्टेबल नांदुरी पोलीस चौकी

सप्तशृंगी घाटात चांगल्या प्रकारे जंगल असुन यात अनेक प्रकारचे पक्षी आहेत. पण पाण्याची व्यवस्था होत नसल्याने अनेक पक्षी स्थलांतर करत होते. गृपचे सदस्य पक्षांना पाणी व खाद्याची व्यवस्था पाऊस पडे पर्यंत करण्यासाठी प्रयत्नशिल आहे.
 - सुभाष राऊत, माजी सरंपच व गृप सदस्य नांदुरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com