VIDEO : वॉटरबेल वाजली...पाणी पिण्याची वेळ झाली...

sinner water bell 2.png
sinner water bell 2.png

नाशिक : केरळ राज्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी राबविलेल्या वॉटर बेलचा उपक्रम सिन्नर तालुक्यातील दापूर प्राथमिक शाळेत नव्यानेच सुरु करण्यात आला आहे. गेल्या महिनाभरापासून प्रायोगिक तत्वावर सुरु झालेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यात महत्वपूर्ण बदल जाणवू लागल्याने हा उपक्रम सर्वच शाळांमधून राबविणे गरजेचे बनले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस.भुवनेश्वरी, शिक्षणाधिकारी डॉ.वैशाली झनकर, सिन्नरच्या गटविकासधिकारी लता गायकवाड, गटशिक्षणाधिकारी शिवनाथ निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली वॉटर बेल हा नाविन्यपूर्ण उपक्रम गेल्या महिनाभरापासून राबवला जात आहे.

उपक्रम जरी छोटा... तरी फलित मात्र उत्तम

विद्यार्थ्यांनी वर्गात प्रवेश केल्यानंतर दर दोन तासाला वर्गातील शिक्षकांनीच तीन टाळ्या वाजवायचा अन् विद्यार्थी त्यावेळी त्यांनी आणलेल्या पाण्याच्या बाटलीतून किमान 100 ते 150 मिली पाणी प्यायचे. असा हा उपक्रम दिवसभरातून तीन ते चार वेळा करायचा. या निमित्ताने विद्यार्थी भरपूर पाणी पिऊ लागले बाटलीत पाणी संपले की शाळेत मधल्या सुट्टीत बाटल्या पुन्हा भरून विद्यार्थ्यांनी सोबत बाळगायच्या. विद्यार्थ्यांचे आरोग्य व्यवस्थित राहण्याच्या उद्देशाने सदर उपक्रम शाळेतील मुख्याध्यापिका चंद्रकला सोनवणे व उपशिक्षक गोरक्ष सोनवणे यांच्या नियोजनातून सुरू करण्यात आला आहे. हा उपक्रम व त्यांचे महत्त्व पालकांच्या व्हाट्सअप ग्रुपवरही टाकण्यात आले आहे. जेणेकरून घरीही पालक त्यांची अंमलबजावणी करतील. उपक्रम जरी छोटा वाटत असला तरी उपक्रमाचे फलित मात्र खूपच चांगले मिळत आहे. विद्यार्थी पाणी जास्त पिऊ लागल्याने त्यांची क्षमता वाढली चेहऱ्यावर तेजही वाढते. अन् भुकही चांगली लागते. अशी मते विद्यार्थी स्वतःच व्यक्त करु लागले आहे.

भविष्यकाळातील विविध आजार थोपवण्यासाठी ही बाब महत्त्वाची

भरपूर पाणी पिल्याने शरिरातील पचनक्रिया व्यवस्थित होऊन पोटाचे विकार कमी होण्यास मदत होते. तसेच भविष्यकाळातील विविध आजार थोपवण्यासाठी ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. तसेच आजारी पडण्याचे परिणाम कमी झाल्यामुळे वर्गाची उपस्थितीही वाढण्यास भरीव मदत झाली या उपक्रमाचे कौतुक पालकांबरोबरच शालेय समिती , ग्रामस्थांनी केले आहे. शाळेच्या पल्लवी घुले, सुनंदा कोकाटे ,गायञी रजपूत ,मनिषा गोराडे ,सुनंदा पवळ,कृष्णकांत कदम,गोरक्ष सोनवणे ,निता वायाळ ,शितल सोनवणे यांची हा उपक्रम राबविण्यासाठी मोलाची साथ लाभत आहे. 

सर्व शाळांनी हा उपक्रम सुरू करावा....
केरळ राज्याच्या धर्तीवर सुरू असलेला वॉटर बेल हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या आरोग्यसाठी नक्कीच फायदेशीर आहे दापूर शाळेने तालुक्यात सर्वप्रथम ह्या उपक्रमाची सुरवात केली आहे ही बाब कौतुकास्पद आहे त्यात सातत्य ठेऊन तालुक्यातील सर्व शाळांनी हा उपक्रम सुरू करावा.-  शिवनाथ निर्मळ (गटशिक्षणाधिकारी, सिन्नर पंचायत समिती)

जिल्हा परिषदेच्या दापूर शाळा नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात असतात. वाॅटर बेलचा उपक्रम स्तुत्यच असून त्याची अंमलबजावणी तालुक्यातील सर्व अंगणवाडी व जिल्हा परिषदेच्या शाळांनी राबविणे गरजेचे आहे.- डॉ.लता गायकवाड (गटविकासाधिकारी, पंचायत समिती, सिन्नर)


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com